मी नतमस्तक* !  ( मला आवडलेला लेख आणि का??? आपल्या भारतीय सेनेतील जवानांना आदर देऊन,सन्मान केला पाहिजे ,जरूर लक्षपूर्वक वाचा)  🌺🌺🇮🇳🌺🌺

*मी नतमस्तक* !  ( मला आवडलेला लेख आणि का??? आपल्या भारतीय सेनेतील जवानांना आदर देऊन,सन्मान केला पाहिजे ,जरूर लक्षपूर्वक वाचा)
 🌺🌺🇮🇳🌺🌺


    देव, देवत्व आंणि तीर्थक्षेत्र, या बाबत अनेकांची विचार भिन्नता असू शकते ,परंतू तिरंगी ध्वजासाठी आयूष्य पणाला लावणारी माणसे, त्यांचे कुटूंबीय आणि घरे,निस्सीम सेवाभावी संस्था ,यांच्या दर्शनाने, मला देवत्वाचीच अनुभूती लाभते. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, आज हा योग जुळून आला. 
    सीयाचीनच्या रक्त गोठवणा-या थंडीत, अनेक सीमारक्षक, निसर्गाशी मुकाबला करताना, जायबंदी होत असतात. हातापायाची बोटे निकामी होणे, हिमवर्षावात गाडले जाणे, हे प्रकार तिथे नित्याचेच असतात.हिमाच्छादित सुवर्ण शिखरे मनमोहक भासली तरी निसर्गाचे रौद्र रूप,हे दुरून डोंगर साजरे, असेच असते. जायबंदी जवान, पुण्यात लष्करी रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर, त्यांची भेट हा दुर्लभ योग असतो तो आज लाभला. 
कायमचे अपंगत्व स्वीकारून, आयुष्याच्या दुस-या लढाईला सामोरे जाण्यासाठी ,वाघाचेच काळीज असावे लागते.आम्ही भेटलो तो सुद्धा शिवरायांचाच बहाद्दर मावळा आहे.
संक्रांतीच्या दिवसात,सूर्य, मकर रास, संक्रमण वगैरे अनेक वर्ष वाचत आलो आहे,पण त्या शब्दांचा अर्थ, या जिगरबाज जवानाच्या भेटीने मला नव्याने समजत होता. 
*शब्दशः नतमस्तक*  !
आनंद सराफ 
सैनिक मित्र परिवार पुणे