आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात* *मायक्रोबायोलॉजी वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद* 

प्रेस नोट 


*आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात*
*मायक्रोबायोलॉजी वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद* 


पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १७,१८ जानेवारी रोजी आझम कॅम्पस असेम्ब्ली हॉल मध्ये होणार आहे. वरिष्ठ अभ्यासक आणि आघारकर इन्स्टिट्यूट मधील शास्त्रज्ञ डॉ.प्रशांत ढाकेफाळकर यांच्याहस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उदघाटन होणार आहे. देशभरातून मायक्रोबायलॉजी शास्त्रज्ञ,अभ्यासक,प्राध्यापक,विदयार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत. विविध संशोधनपर निबंध सादर केले जाणार आहेत. भित्तीपत्रके स्पर्धा आणि तज्ज्ञांची सादरीकरणे देखील या परिषदेत होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य डॉ शैला बुटवाला,मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ देवप्रिया मजुमदार,प्रा.नुसरत शेख आणि प्रा.गौरी देवस्थळे यांनी दिली. 


------------------------