मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ भीषण अपघात 

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ भीषण अपघात 
________________________________


मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसटी पुलावरुन कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून दापोलीकडे जाताना पहाटे साडे पाच वाजता कळमजे पुलावर ही घटना घडली आहे. अपघातात 20 प्रवासी जखमी, तर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा पूल 100 वर्षे जुना असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.