सार्वजनिक मकरसंक्रांत अर्थात तिळगुळाबरोबर गीत, संगीत, नृत्याचा अभूतपूर्व अविष्कार - कोथरूड आमदार सांस्कृतिक सोहळा - आम्ही कोथरूडकर*    १५ जानेवारी २०२०

*सार्वजनिक मकरसंक्रांत अर्थात तिळगुळाबरोबर गीत, संगीत, नृत्याचा अभूतपूर्व अविष्कार - कोथरूड आमदार सांस्कृतिक सोहळा - आम्ही कोथरूडकर*   


१५ जानेवारी २०२०
संध्याकाळी ६ ते १०
ठिकाण - एम. आय. टी. विश्वशांती विद्यापीठ मैदान, पौड रोड, पुणे


*संकल्पना-निर्मिती - सुनील महाजन आणि संवाद, पुणे टीम*


*सर्वांना मुक्त प्रवेश आणि आग्रही आमंत्रण*


‘तीळगुळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत गीत, संगीत आणि नृत्याच्या जोडीने मकरसंक्रांतीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी आम्ही कोथरूडकर अर्थात कोथरूड आमदार सांस्कृतिक सोहळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यातील दिग्गज कलाकारांच्या सहभागाने पुणेकर रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरणार आहे.


*भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून भाजपाचे प्रदेश सचिव राजेश पांडे आणि संवाद पुणेतर्फे या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  आहे.* 


या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष-आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. 


या सोहळ्यात कीर्ती शिलेदार, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, विजय घाटे, अनुराधा कुबेर, प्रियांका बर्वे, योगिता गोडबोले, अंजली मराठे, अमेय जोग, अमृता नातू, त्यागराज खाडीलकर, दिपिका जोग, सौरभ दफ्तरदार, अली हुसेन या गायक कलाकारांसह स्वाती दैठणकर, भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, पूजा पवार, अभ्यंग कुवळेकर, नुपूर दैठणकर, शीतल कोलवालकर हे नृत्य कलावंत सहभागी होणार आहेत. प्रसाद जोशी, विक्रम भट, अजय अत्रे, सारंग कुलकर्णी, अनय गाडगीळ, मिहिर भडकमकर, नितीन कुलकर्णी, आदित्य आपटे, रोहन वनगे हे कलाकार साथसंगत करणार असून योगेश देशपांडे, राहुल सोलापूरकर आणि रवींद्र खरे निवेदन करणार आहेत. 


सामूहिक तीळगुळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल.


या कार्यक्रमाची संकल्पना-निर्मिती सुनील महाजन यांची असून नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. अमेय जोग, महेश थोरवे यांनी संयोजन केले आहे.


*कोथरूडकरांचा सन्मान*
या कार्यक्रमात प्रभाकर जोग (संगीतकार), कीर्ती शिलेदार (नाट्यसंगीत), डॉ. विश्वनाथ कराड (शिक्षणतज्ज्ञ), लीला गांधी (नृत्य), अन्वर कुरेशी (गायन), श्रीकांत मोघे (नाट्य), सुलभा तेरणीकर (समीक्षक), हेमा लेले (कवी), प्रकाश-अरविंद चाफळकर (चित्रपट प्रदर्शन, सिटीप्राईड) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


*कोथरूड गीत*
*कोथरूड आमदार सांस्कृतिक सोहळ्यानिमित्त खास कोथरूड गीत तयार करण्यात आले आहे. *‘पुण्यनगरीच्या कुशीत वसले आमचे माहेरघर, ओळख ही मानाने सांगतो आम्ही कोथरूडकर’* या गीताद्वारे कोथरूडच्या सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, उद्योगक्षेत्राची ओळख होणार आहे.


कृपया आपण मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत उपस्थित रहा आणि इतरांना हा संदेश पुढे पाठवा ही विनंती.


संवाद पुणेच्या फेसबुक पेजला फॉलो करा
👉 fb.me/samwadpune


संकेतस्थळाला सबस्क्राईब करा...
👉 www.vishwamarathiparishad.org/samwad