तिरूपतीला, शिर्डीला एअरपोर्ट... मग पंढरपूरला का नाही

तिरूपतीला, शिर्डीला एअरपोर्ट... मग पंढरपूरला का नाही ???


धार्मिक स्थळे :
भारतात व जगात वेगवेगळ्या जाती, पंथ, धर्मानुसार प्रसिध्द व पवित्र स्थळे आहेत. तुम्ही बऱ्याच धार्मिक स्थळांना गेला असाल. तेथील साधने सुविधा, स्वच्छता, बाजारपेठ, हॉटेल्स, टुरिस्ट गाड्या, एअरपोर्ट, इत्यादी आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घ्या. मंदिर परिसरातील अतिभव्य मंडप, त्याचे अत्युच्च दर्जाचे बांधकाम, तेथील महाप्रसाद इत्यादी... मी एका धार्मिक स्थळाच्या प्रोजेक्टवर काम करतोय. त्यासाठी भारतातील प्रमुख मोठया धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. सरासरी प्रमुख धार्मिक स्थळाला १ कोटीहून अधिक लोक एका वर्षात भेटी देतात. एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सरासरी १००० कोटींची उलाढाल होते.


भक्त श्रीमंत तर देव श्रीमंत :
विविध स्थळाच्या ठिकाणी मोटेल्स बांधणे म्हणजे मोठी गुंतवणूक होते. गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन असा होता की जेथे एअरपोर्ट आहे तेथेच फक्त मोटेल्स बांधू. जेथे एअरपोर्ट नाही याचा अर्थ तेथील भक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, तेव्हा मोटेल्स चालणार नाहीत. मित्रहो, पैशावर आपल्या देवाचीसुद्धा प्रत ठरते हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपली पंढरपूरसारखी श्रद्धास्थाने श्रीमंत व एअरपोर्ट सारख्या सुविधांनी संपन्न असावीत, असे वारकऱ्यांना वाटत असेल तर वारकऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी उद्योगात उतरले पाहिजे. त्यांच्यामध्ये वारीला विमानाने येण्याची आर्थिक कुवत निर्माण झाली पाहिजे. पंढरपुरात वारकर्‍यांच्या दर्शनासाठी रांगा रस्त्यावर कित्येक किलोमीटरपर्यंत लागायच्या.. दर्शन मंडप उभा राहण्यासाठी कित्येक वर्षे लागली.


टाळ सोबत तराजू :
पंढरपूरला एअरपोर्ट व्हायचे असे वारकऱ्यांना वाटत असेल तर आता हातात टाळ व सोबत तराजू घेण्याची आवश्यकता आहे. ज्या व्यापारी समाजाने तराजू हातात घेतले व अमाप पैसा कमवला त्यांची देवस्थळे, मंदिरे बघा किती प्रशस्त व श्रीमंत आहेत. आम्ही वारकऱ्यांनी शेती केली व टाळ हाती घेवून भक्ती केली. शेवटी पाहत आहात आज शेतीची काय अवस्था आहे? माझा वारकरी बांधव आज गरीबी, दुष्काळाच्या छायेत आहे . कित्येक शेतकर्यांपनी आत्महत्या केल्याचे रोज वाचनात येते. आपण पूर्ण आयुष्य टाळ घेतले व विठूरायाची उपासना केली. पण तुमच्या अडचणीला देव धावत येतो का ? वारकरी मित्रहो, जर गेल्या पन्नास वर्षात टाळ, भजन, कीर्तन तुम्ही थोडे कमी केले असते व तुमच्याकडे असणारे काही टाळ वितळवून तुम्ही तराजू केले असते आणि व्यापार उद्योगाची कास धरली असती तर आज तुमच्या दारी प्रचंड श्रीमंती असली असती. तुम्ही चालत किंवा एसटीने नव्हे तर स्वत:च्या कारने वारीला गेला असता. सर्व वारकरी वर्ग जर व्यापारी असता तर सरकारने विमानतळ काढले असते. पंढरपूरला अनेक विमान कंपन्यांनी मुंबई- पंढरपूर, पुणे –पंढरपूर अशी सेवा सुरू केली असती. प्रत्येक वारीला तुम्ही विमानाने आला असता . तेव्हा तुमचा देव श्रीमंत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर वारकऱ्यांना प्रथम श्रीमंत व्हावे लागेल आणि टाळ वाजवून, भजन करून, कीर्तन ऐकून वा हरिपाठ करून श्रीमंत होता येणार नाही . त्यासाठी व्यापार उद्योगात उतरावे लागेल. सर्व वारकऱ्यांनी निश्चय केला पाहिजे की प्रत्येकाने व्यापारात उतरू. कोणत्याही परिस्थितीत पुढील काही वर्षात पंढरपूरला एअरपोर्ट होईलच.
वारकऱ्यांना व्यवसायाची माहिती देण्यासाठी एक योजना संत साधू महाराज समितीचे वतीने सुरु करीत आहे, लवकरच ती चालू होईल. हा लेख तुमच्या परिचित वारकऱ्यांना जरूर पाठवा.


प्रा. प्रकाश भोसले
संत साधू महाराज समिती, पंढरपूर.


जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विझडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विझडम प्राप्त होण्यास मदत होईल.
वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा उत्कृष्ट कमेंटला मी लिहिलेले "उद्योजकता" पुस्तक भेट म्हणून दिले जाईल. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.
फेसबुक पेज लिंक:- https://bit.ly/39515PT


प्रकाश भोसले यांचे एकदिवसीय 'उद्योजकता सेमिनार'...
१२ जानेवारी २०२० रोजी
सकाळी १०.०० ते सायं. ६.००
या सेमिनारमध्ये आर्ट ऑफ सेल्फ-मॅनेजमेन्ट, फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शिअल प्लॅनिन्ग अँड अनालिसिस, मार्केटिंग, बिझनेस लीडरशिप, बिझनेस एक्सपान्शन, उद्दिष्टांची निश्चिती, भांडवल व इतर उत्पादक घटकांचा परिपूर्ण वापर, व्यवसाय स्थान निश्चिती, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील परस्परसंबंध, व्यावसायिकाची संशोधनवृत्ती, दूरदृष्टी, अचूक निर्णयक्षमता, व्यावसायिक निष्ठा व नीतिमत्ता, संशोधनात्मक व विश्लेषणात्मक वृत्ती, खास व्यवसायकौशल्य या विषयावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
इच्छूकांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा. फक्त काही बुकिंग शिल्लक...
अधिक माहितीसाठी संपर्कः: ८३५५९७९२३२ /९२२२०८६५६३ / ८१६९७४९२६४
कृपया बुकिंगसाठी येथे क्लीक करा 👉🏻 https://imjo.in/VyE5tW


आपला,
प्रकाश भोसले
व्हॉट्स अप क्रमांक :- ९८६७८०६३९९


© प्रकाश भोसले
ISBN 978-81-929682-0-12


#पंढरपूर #किर्तन #pandharpur #वारकरी‌ #भक्तनिवास #यात्रेकरुविसावा #विश्रामगृह #guesthouse #entrepreneur #business #entrepreneurship #smallbusiness