नव्या युगाच्या आधुनिक जिजाऊ आणि सावित्री घडवाव्या लागतील. –विकास पासलकर. 

नव्या युगाच्या आधुनिक जिजाऊ आणि सावित्री घडवाव्या लागतील. –विकास पासलकर.


मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा लाल महालात आयोजित करण्यात आला होता.  


   छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे असे दोन छत्रपती घडविणारी माता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब गेली साडेतीनषे वर्षे या मातेचा आदर्श माता असा सन्मान या महाराष्ट्रात होत आहे. राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श घेऊन आजच्या काळात अनेक महिला आपल्या अपत्यांना संस्काराची शिदोरी देत आहेत. या संस्कारामुळेच त्यांच्या मुलांनी शून्यातून आपल विश्व उभे केले आहे. त्याचप्रमाणे Pay Back to society या तत्वानुसार समाजातील गरजू व उपेक्षित सामाजबांधवाना मदत करत आहेत. अनेक लोक सामाजिक कार्यासाठी वाहून घेतात. त्याना ही सामाजिक बांधिलकी त्यांच्या आईकडून मिळत असते. आज जिजाऊ असत्या तर त्यांनी या आदर्श मातांना लाल महालात बोलावून सन्मानित केले असते. हीच भावना मनात ठेऊन सामाजातील अशा आदर्श मातांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असे मनोगत विकास पासलकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सावानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सकाळ वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका शितल पवार, मराठवाडा कॉलेजचे प्राचार्य सारंग येडके, मराठा सेवा संघाचे मारुतीराव सातपुते माजी महापौर कमलताई व्यवहारे जिजाऊ ब्रिगेडच्या अमृता मगर उपस्थित होते. या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हर्षदा देशमुख जाधव यांना आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार मा.सायली नलावडे कविटकर यांना प्रदान करण्यात आले. तर आदर्श आपत्ये घडविणाऱ्या मातांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वडघुले यांनी तर आभार प्रशांत धुमाळ यांनी मानले. सावित्रीबाईनी महिलांच्या शिक्षणासाठी अंगावर चिखल झेलला, परंतु आजही सावित्रीबाईचा संघर्ष संपलेला नाही. समाजात काम करताना संभाजी ब्रिगेडने महिलांच्या पाठीशी उभे राहावे अशी भूमिका अध्यक्षीय मनोगतात शितल पवार यांनी मांडली. लाल महालात शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.