पुण्यात तीन दिवसीय  'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'*                                               ..............................................        *31 जानेवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन*                                                        ..........................................                                                                                             नाट्य ,काव्य ,चर्चा ,गायन  आणि साहित्यविषयक बहुआयामी कार्यक्रमांचे आयोजन         

PRESS NOTE     22/01/20 20*पुण्यात तीन दिवसीय  'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'*                                               ..............................................     
  *31 जानेवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन*                                                       
..........................................                                                                                             नाट्य ,काव्य ,चर्चा ,गायन  आणि साहित्यविषयक बहुआयामी कार्यक्रमांचे आयोजन        
 ................................................                                                                                           २५ हून अधिक लेखक ,कलाकार ,गायक यांचा सहभाग 


पुणे:


' दकनी अदब फाऊंडेशन' तर्फे पुण्यात 31 जानेवारी पासून तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य,कविता, नाट्य, चर्चा अशा बहुरंगी,बहु आयामी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हल मध्ये केले जात आहे.फेस्टिव्हलचे हे दुसरे वर्ष आहे.


' दकनी अदब फाऊंडेशन'चे संचालक जयराम कुलकर्णी यांनी ही माहिती श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला मनोज ठाकूर, रवींद्र तोमर  उपस्थित होते.


31 जानेवारी ते 3 फेब्रवारीपर्यंत  बालगंधर्व रंगमंदिर आणि नेहरू सभागृह (घोले रस्ता) येथे या फेस्टीव्हलचे विविध कार्यक्रम होतील. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते 31 जानेवारी सायंकाळी सहा वाजता उद्घाटन कार्यक्रम होईल.यावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज, माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, साखर आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित राहणार आहेत.


विशाल भारद्वाज, आरती अंकलीकर, सुबोध भावे,डॉ कुमार विश्वास, स्वानंद किरकिरे, अशोक नायगावकर, मुनव्वर राणा, दानिश हुसेन, निझामी ब्रदर्स, लुबना सलीम असे 25 हून अधिक कलाकार,साहित्यिक,गायक,पटकथा लेखक,कवी  या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होणार आहेत.


फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी http://deccanliteraturefestival.org/   संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली.


पहिल्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर येथे  ३१ जानेवारी रोजी उद्घाटन कार्यक्रमानंतर  विशाल भारद्वाज यांच्या उपस्थितीत ‘व्यावसायिक चित्रपटातील कल्पकता’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.’विरासत’ या कार्यक्रमात आरती अंकलीकर यांच्या गायनाने पहिल्या दिवसातील कार्यक्रमांचा समारोप होणार आहे.


दुसर्या  दिवशी १ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र ग्रुप च्या नाटकाने प्रारंभ होणार आहे.’समाजाची बदलती भाषा ‘ या विषयावर परिसंवाद होणार असून बॉलीवूड मधील पटकथा लेखक जावेद सिद्दिकी ,वेब सिरीज चे दिग्दर्शक श्रावण करात आदी सहभागी होणार आहेत.अभिनेते सुबोध भावे हे ‘प्रादेशिक सिनेमा आणि वाहिन्यांचा उदय ‘ या विषयावर बोलणार आहेत.त्यांनतर स्वानंद किरकिरे यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम होणार आहे.’गीतकारी’ असे या कार्यक्रमाचे नाव असणार आहे.दानिश हुसेन हे उर्दू कथाकथन (दास्तान गोई) सादर करणार आहेत.’रंग ‘ या मुशायऱ्याने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप होईल .डॉ कुमार विश्वास,मुनव्वर राणा,स्वानंद किरकिरे यात सहभागी होतील.दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम बालगंधर्व आणि नेहरू सभागृह या दोन्ही ठिकाणी होतील .


तिसऱ्या दिवशी २ फेब्रुवारी रोजी कवी  अशोक नायगावकर आणि वैभव जोशी हे ‘मराठी कवितेचा प्रवास’ सादर करतील आणि काव्यवाचन करतील.आधुनिक भारतीय साहित्यावर समीक्षक उदय प्रकाश बोलतील .’धनक ‘ या कार्यक्रमात अनेक भाषातील कविता सादर केल्या जातील .लुबना सलीम या ‘गुडम्बा’ हे नाटक सदर करतील. मुनव्वर राणा यांचा ' ये जो देस है मेरा' हा कार्यक्रम सादर होईल.निझामी ब्रदर्स च्या ‘शाम-ए –सुफिया’ कव्वाली कार्यक्रमाने फेस्टिव्हल चा समारोप होईल. तिसऱ्या दिवशीचे कार्यक्रम बालगंधर्व आणि नेहरू सभागृह या दोन्ही ठिकाणी होतील
 ...............................................


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान