काँम्पेक्स" 2020  "व्हीसीएमडीडब्लूए" चे २८ व्या वर्षात पदार्पण... विनय धर्माधिकारी

 


"काँम्पेक्स" 2020  "व्हीसीएमडीडब्लूए" चे २८ व्या वर्षात पदार्पण... विनय धर्माधिकारी
-------------------------------------
चार दिवसीय भव्य आयोजन होणार स्मार्ट सिटी नागपूरात
------------------------------------नागपूर:-दि.४जाने.(सविता कुलकर्णी):- "विदर्भ कँम्प्युटर्स अँन्ड मिडिया डिलर्स  वेलफेयर एसोसिएशन तर्फे २८ वे "व्हीसीएमडीडब्लूए" चे भव्य  आय टी प्रदर्शन"काँम्पेक्स"चे चार दिवसीय आयोजन  येत्या ९ जानेवारी पासून रेशिमबाग ग्राऊंड, नागपूर येथे साय. ४वा  आयोजित करण्यात येणार आहे. या काँम्पेक्स चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.


          दक्षिण-पश्चिम नागपूरातील आयटी प्रेमीसाठी ही एक एक पर्वणीच ठरणार 


आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अद्यायावत हार्डवेयर पासून अप्लीकेशनवर आधारित साँफ्टवेयर पर्यंत कायम
 यशस्वी देणारे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात ८० स्टाँल्स,१००नामांकित कंपन्याचा समावेश होणार आहेत. प्रदर्शनात एच.पी.,कँनान,इप्सान, अँब्सुलूट स्टोअर, आसूर,ब्रदर, डेल, टीपी लिंक, डी-लिंक, एसर, लिनीयो आदी मोठ्या कंपन्याचे पाव्हेलियन राहणार.भारतातील हे सर्वात भव्य असे प्रदर्शन असून यामध्ये कँम्प्युटर्स व प्रिंटर्स सायबर सेक्युरिटी,क्लाऊड कँम्प्युटरींग, सव्हलियन्स, आधुनिक तंत्रज्ञान व सोल्युशन आदींचे मोठे प्रदर्शन राहिल. मुख्यतः या प्रदर्शनामध्ये सायबर सेक्युरिटी,फेसबुक सिक्युरिटी उपकरणे, आँनलाइन ट्रानज्क्शनफ्राँड्स, एटीएम फ्राँड्स, सोशल इंजीनियरिंग अटँक आदींवर चर्चासत्र देखिल होणार आहे.अशी माहिती पत्रपरिषद मध्ये व्हीसीएमडीडब्लूए चे अध्यक्ष विनय धर्माधिकारी यांनी दिली. प्रदर्शना दररोज दुपारी १२ ते रात्री ९ वा.पर्यंत सूरू राहणार असून निशुल्क प्रवेश राहिल. या प्रदर्शनाला १लाख पेक्षा ही जास्त लोक भेट देतात. या कँम्पो एक्सपो चे अध्यक्ष यांना आँनलाइन खरेदी बाबत विचारले असता ते म्हणाले की, ग्राहकांनी उपकरणे ही कमी किंमतच्या लालसेने घेतल्यानंतर त्यात त्यांची पूर्ण पणे फसवणूक केली जाते. त्यांना डुप्लीकेट उपकरणे देण्यात येतात. ग्राहकांनी चांगल्या कंपनीचे उपकरणे कंपनी दुकानदार कडूनच खरेदी करावे. असे आव्हान त्यांनी यावेळी पत्रपरिषदच्या माध्यमातून केले. या प्रदर्शनात लँपटाँप आणि पीसीमधिल नविनतम गोष्टींची झलक दिसणार आहे. तसेच महाराष्ट्र मेट्रो काँर्पोरेशन काँम्पेक्स चे मुख्य प्रायोजक आहेत. मेट्रोचे ५वी बीएम तंत्रज्ञान बांधकाम जगातील नविनतम साँफ्टवेयर आहे. पत्रपरिषद मध्ये उपस्थित व्हीसीएमडीडब्लूए चे सचिव ललित गांधी, उपाध्यक्ष दिनेश नायडू, कोषाध्यक्ष जयंती पटेल, सहसचिव रणजीत उमाठे, सदस्य संजय चौरसिया,रोहित जयस्वाल व शहजाद अख्तर इ.उपस्थित होते.