बँक ऑफ महाराष्ट्रची  प्रगतीपथावर घोडदौड; बँकेस डिसेंबर 2019 च्या तिमाहीत रु. 135 कोटींचा निव्वळ तर कार्यान्वयन नफा रु. 842 कोटी

प्रसिद्धीसाठी


बँक ऑफ महाराष्ट्रची  प्रगतीपथावर घोडदौड;


बँकेस डिसेंबर 2019 च्या तिमाहीत रु. 135 कोटींचा निव्वळ तर कार्यान्वयन नफा रु. 842 कोटी


 


पुणे, जानेवारी 20, 2020: बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने आज बँकेच्या डिसेंबर तिमाही आणि 31 डिसेंबर 2019 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांना आज मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मंजूरी दिली. खाती लेखापरीक्षकांच्याद्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहेत.


 


कामगिरीची ठळक वैशिष्टे 


 


नफा



  • बँकेचा कार्यान्वयन नफा रु 842 कोटीं झाला असून ही मजबूत वाढ 95% आहे.

  • बँकेचा निव्वळ नफा रु. 135 कोटीं झाला असून वार्षिक आधारावरील रु 3764 कोटी तोट्याच्या पार्श्वभूमीवर हा नफा आहे. नफ्यामधील ही वाढ बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न, मोठ्या प्रमाणात केली गेलेली जोमदार वसूली आणि बँकेने घातलेल्या खर्चावरील नियंत्रणामुळे ही वृद्धी साध्य झालेली आहे.

  • व्याज उत्पन्न रु 3016 कोटीने वाढलेले असून ही वृद्धी 14 % आहे.

  • निव्वळ व्याज उत्पन्न रु 1186 कोटी झाला असून ही वाढ 36 % इतकी आहे.

  • व्याजेतर उत्पन्न रु 442 कोटी झालेली असून ही वाढ 8 % झाली आहे.

  • ठेवींवरील मूल्य घटलेले असून ही घट  5.01 % च्या तुलनेंत 4.81 % झाली आहे.

  • निव्वळ व्याजामधील अंतर (नेट इंटरेस्ट मार्जिन) या मध्ये देखील 2.41 % च्या तुलनेत 2.86 % वाढ झालेली आहे.

  • मूल्य आणि उत्पन्न यांचे गुणोत्तर डिसेंबर 2018-19 तिमाहीच्या 48 % तुलनेत वाढून डिसेंबर 2019-20 तिमाही मध्ये 66% झाले आहे. 


नऊ महिन्यांची लाभप्रदता ( नऊमाह आर्थिक वर्ष 2018-19 ते नऊ माह आर्थिक वर्ष 2019-20)  



  • कार्यान्वयन नफ्यामध्ये मजबूत वाढ रु. 2252 कोटी इतकी झाली असून ही सुदृढ वृद्धी 33 % झाली आहे. 

  • निव्वळ नफ्यामधील वाढ रू.  4856 कोटी तोट्याच्या तुलनेत रू.  331 कोटी झालेली आहे.

  • व्याज उत्पन्न वाढून ते रू.  8689 कोटी झालेले असून ही वाढ 7.61 % आहे.

  • निव्वळ व्याज उत्पन्न वाढलेले असून ते रु 3256 कोटी झालेले आहे आणि ही वाढ 19.12 % इतकी आहे.

  • व्याजेतर उत्पन्न वाढून ते रु 1257 कोटी झाले असून  ही वाढ 8.21 % झाली आहे. 

  • निव्वळ व्याजामधील अंतर 2.50% च्या तुलनेत वाढून 2.68% झाले आहे. 


व्यवसाय



  • बँकेचा एकूण व्यवसाय दिनांक 31.12.2019 रोजी 235867 कोटी एव्हढा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत 4.55 % वाढ दर्शवली आहे.  

  • बँकेच्या एकूण ठेवींमध्ये रु. 141986 कोटींची वृद्धी झालेली असून ही वाढ 4.4 % आहे.

  • कासा ठेवी (बचत आणि चालू खात्यातील ठेवी) दिनांक 31.12.2019 रोजी रु. 68246 कोटी इतक्या झालेल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत त्यात 7.04 % वाढ झाली आहे.

  • एकूण ठेवींमधील कासा ठेवींचे प्रमाणात 31.12.2018 च्या 46.88 % च्या तुलनेत 31.12.2019 रोजी 48.07 % झाल्या आहेत. 

  • 31.12.2019 रोजी बँकेची एकूण कर्जे रु 93882 कोटी आहेत.

  • कृषी कर्जे, किरकोळ कर्जे तसेच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम व्यवसायामध्ये 57 % वाढ झालेली असून एकूण कर्जाच्या 31.12.2019 रोजीच्या तुलनेत 54 % झालेली आहेत. 


मालमत्तेची गुणवत्ता 



  • 31.12.2019 रोजी एकूण थकीत कर्जे रु. 15746 कोटी (16.77 %) झालेली असून 31.12.2018 रोजीच्या रु. 15509 कोटी (17.31 %) झालेली आहेत. (16.86 % 30.09.2019 नुसार)

  • 31.12.2019 रोजी निव्वळ थकीत कर्जे रु. 4507 कोटी (5.46 %) झालेली असून 31.12.2018 रोजी रु. 4647 कोटी (5.91 %) झाली आहेत (5.48 % 30.09.2019 नुसार)

  • बँकेने संरक्षक गुणोत्तर तरतुदीमध्ये पोषक गुणोत्तर राखले असून हे गुणोत्तर 31.12.2019 रोजी 82.63 % इतके आहे.


भांडवल पर्याप्तता  



  • भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 31.12.2019 रोजी 11.21 % एव्हढे झाले असून ही वाढ 31.12.2018 रोजीच्या 11.049 % तुलनेत  झालेली आहे. ( 11.83 % 30.09.2019 नुसार) 

  • 31.12.2019 रोजी टायर 1 गुणोत्तर 9.44 % इतके राहिले आहे. ( 10.01 % 30.09.2019 नुसार) 


 


फोटो:


बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँकेचे तिसरी तिमाही-2019-20 वर्षाचे आर्थिक निकाल दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी बँकेच्या पुणे स्थित लोकमंगल मुख्यालयी एका पत्रकार परिषदेमध्ये  जाहीर केले. 


 


फोटोमध्ये ( डावीकडून): बँकेचे सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्तीय अधिकारी श्री व्ही पी श्रीवास्तव,  कार्यकारी संचालक श्री. ए. सी. राऊत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव आणि आणि कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा उपस्थित होते.