*प्रसिद्धी साठी*
1372 कर्मचारी पी एम पी एम. एल च्या सेवेत कायम
उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या आदेशानंतर कायम करण्याचा निर्णय
..आमदार आण्णा बनसोडे यांच्य पाठपुराव्याला आले यश.
पीएमपी मध्ये 12 ते 15 वर्षापांसुन रोजंदारी पध्दतीनेकाम करणार्या 1372 कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने व आमदार आण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनास निर्णय घेण्यास भाग पाडले गुरुवार दि.9/1/2020 पासुन संचालक मंडळ यांच्या हस्ते पीएमपी राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 5 चालक, 5 वाहक,5क्लिनर,5 स्वच्छता कर्मचारी, या सर्व कामगारांना नियुक्ती पत्रे देण्यात आले
12 वर्षांपासुन रखडलेला हा प्रश्न सुटल्यामुळे कामगार संघटना व कर्मचार्यांनी पेढे वाटुन जल्लोष साजरा केला
पीएमपी च्या अध्यक्षा नयना गुंडे व सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठनकर यांनी या बाबतच्या प्रकियेत गेल्या आठ महिन्यापासुन लक्ष घातले होते
पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे म्हणाले उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे अजित दादा पवार यांनी स्विकारल्यावर संघटनेचे शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा कायम नियुक्तीचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची त्यांना विनंती केली यावेळी दादांनी लगेच फोन करुन प्रशासनाला आदेश दिले व आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कायम नियुक्ती करण्याचा निर्णय झाला
पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी,माजी नगरसेवक संदिप चिंचवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर ,सुनिल काटे,संतोष शिंदे,राहुल जोगदंड,प्रफ्फुल शिंदे निखिल कुंभार,आकाश तिवारी,विनायक वायकर,सचिन काळभोर,तुकाराम कारोटे यांनी आमदारांना पेढे भरवुन आमदारांचे मनापासुन आभार व्यक्त केले