गगनभरारी,सरस्वतीच्या  उपासकांची* ! !

*गगनभरारी,सरस्वतीच्या  उपासकांची* ! !
🤝🤝🇮🇳🤝🤝
आडवाटेवरील एखादे छोटे गाव, जगाच्या नकाशावर उजळण्याची काही मोजकी उदाहरणे, सर्वज्ञात आहेत.राळेगणसिद्धी,भिलारवाडी बरोबरच आता,शिक्रापूर जवळील वाबळेवाडीचे नाव, आदर्श शाळेच्या यशस्वी संकल्पनेतून  सर्वदूर ज्ञात झाले आहे. एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळा प्रमाणे,  शिक्षणप्रेमींची अलोट गर्दी, या छोट्याशा गावी होत आहे.चंदूकाका सराफ पेढीच्या, शिक्षण विकास योजनेतून, नुकतीच या शाळेला भेट दिली.  चित्रपटातील तारे तारकां प्रमाणे, अनेकजण येथील शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून छायाचित्रण करीत असलेले समक्ष पाहिले. 
     पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीचे, अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय विद्यालय ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, सध्या जगभरातील शिक्षणप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. इधे परिवर्तनाचे आणि विकासाचे वारे वाहू लागले ते 2012 मधे जेव्हा दत्तात्रय बबनराव वारे हे मुख्याध्यापक म्हणून रूजू झाले. त्यावर्षी दुसरी पर्यंत असलेल्या या शाळेत केवळ बत्तीस विद्यार्थी होते. आता नववीपर्यंतच्या वर्गात, सहाशे दहा विद्यार्थी असून प्रतीक्षायादी, चार हजाराचे पुढे आहे. बारा अधिकृत शिक्षकां बरोबरीने ,दोनशेपेक्षा अधिकजण अध्यापन सहयोग देत आहेत. हा चमत्कार आणि शाळेचे वेगळेपण, इथे जाणून घेऊया. 
🌺शालेय अभ्यासक्रमा बरोबरच इथे विद्यार्थांच्या प्रतिभेला आणि कलाविष्कारासाठी पूर्ण वाव दिला जातो. 
🌺वर्ग खोल्या पारंपरिक बंदिस्त नसून, काचगृहांसारख्या आणि बैठक व्यवस्था ओट्यासमान आहे. बिनभिंतीची खुली शाळा ही संकल्पना, अप्रत्यक्षपणे साकारली आहे. 
🌺आवड आंणि अभ्यास विचारात घेऊन, इथे *विषय मित्र* संकल्पनेतून शिक्षक होता येते. 
🌺जगभरातील शिक्षणप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांचा, इथे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुसंवाद असून, शनिवारचा दिवस, त्यासाठी राखीव असतो. 
🌺शिक्षक आणि पालकांच्या वेळोवेळीच्या समूपदेशनातून, नेमकी वाटचाल, स्पष्ट होते. 
🌺 खेळ आणि आरोग्य संवर्धनाला, मुक्त वाव आहे. 
🌺शाळेच्या कानाकोप-यातील स्वच्छता आणि रंगसंगती, आल्हाददायक वाटते. 
समाजमाध्यमाची लेखन मर्यादा लक्षात घेता, अधिक माहितीसाठी, यू ट्यूब अथवा गुगलवर, जरूर शोध घ्यावा. 
सरस्वतीच्या सच्चा उपासकांची कार्य व्यापकता वाढावी यासाठीच, हे लेखन प्रयोजन आहे. 
   *आनंद सराफ*
   9822861303