सुर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण,ग्रहण म्हटलं की श्रध्दा व अंधश्रध्दा आलीच*

*सुर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण,ग्रहण म्हटलं की श्रध्दा व अंधश्रध्दा आलीच*


*ग्रहण पाळणं,न पाळणं ही वैयक्तिक गोष्ट आहे.*
हिंदू धर्मात तर ग्रहणकाळात अमुक-तमुक गोष्ट करावी,यांची एक यादी बनेल. पण ग्रहण आहे म्हणून एखादं शासकीय काम थांबवणं, हे स्वीकारणं थोड जड जातं.असाच काहीसा प्रकार पुणे महानगरपालिका मध्ये घडला आहे..
*पुणे.मनपा,भाजपा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एक मागणी केली आहे,* कि 
हिंदू धर्मात ग्रहण काळ समाप्तीनंतर स्नान करण्याची परंपरा आहे.त्यामूळे आज गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल.आणी पाणीपुरवठा ग्रहण काळ संपेपर्यत नेहमीप्रमाणे सुरू ठेवावा.अशी अजबगजब मागणी पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या एक नगरसेविकेने केली आहे.आज देशभरात सुर्यग्रहण दिसणार आहे.ते संपल्यानंतर नागरिकांना व महिलांना अंघोळ करावी लागते. या मागणीचे निवेदन त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणी सभाग्रह नेते धीरज घाटे यांना दिले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
*काल परवा रूपाली पाटील या   महिलेने पुणेकरांना कमी दाबाने पाणी मिळत आहे म्हणून ंदोलन केलं व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरंतर हे काम सत्ताधार्‍यांचा आहे परंतु त्यांना ते जमत नाही म्हणून महिलांना या ठिकाणी आंदोलन करावे लागत आहे*


खर्डेकर ताईला कुणीतरी सांगा कि, पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे.नरेंद्र दाभोळकर आणी त्याच्यासारख्या अनेक सामाजिक कार्येकर्ते आजही अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करत आहेत.
*आज पुण्यासारख्या शहराच्या आसपास ची सगळी धरण तुडुंब भरलेली आहेत आणि पुणेकरांना प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही त्यासाठी सकाळी किंवा रात्री घरी एका माणसाला थांबून पाणी भरण्यासाठी वेळ वाया घालवावा लागतो आणि या ताई सत्ताधारी पक्षात असतानासुद्धा यावर एक सुद्धा शब्द बोलत नाही* *या आमच्या ताईला पुणेकरांच हाल होत आहेत ते दिसत नाही  परंतु खोटी अंधश्रद्धेला बळी पडून धर्म बुडेल याची मात्र चिंता लागली आहे*
पुणे मनपा सारख्या सर्वांना आदर्श असलेल्या महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी असलेल्या  आमच्या ताई चा डोक्यातील अंधश्रद्धा लवकरात लवकर दूर होऊन आणि याउलट पुणेकरांना पाणी पुरेशा दाबाने वेळेत मिळत नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारावा व पुणेकरांना या त्रासापासून मुक्त करावे  *याच ग्रहणाच्या आमच्या ताईला शुभेच्छा*
           प्रशांत धुमाळ
               पुणे