माजलगावजवळ कार- ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

माजलगावजवळ कार- ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी
_________________________________


राष्ट्रीय महामार्ग 61 कल्याण-विशाखापट्टणमवर गंगामसलाजवळ कार व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती असून त्यावरबीडयेथे अधिक उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती अशी की, विजय ज्ञानेश्वर कानडे ( 24, रा.पिंपळगांव ता. जिंतूर ), रूपाली विनायक जावळे ( 24, रा. शिवाजीनगर, परभणी ) व विनायक दत्तात्रय जावळे ( 58, रा.शिवाजी नगर परभणी ) हे तिघेजण परभणीकडे कारने  ( क्रमांक एम. एच. 14 जी. यु. 2731) मंगळवारी मध्यरात्री जात होते. दरम्यान, गंगामसला जवळ पुण्याकडे जाणाऱ्या जिजाऊ ट्रॅव्हल्स (क्र. एम. एच. 22 एफ. 8899) मध्ये समोरासमोर धडक झाली.यात कारमधील विजय ज्ञानेश्वर कानडे व रूपाली विनायक जावळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनायक दत्तात्रय जावळे हे गंभीर जखमी आहेत. रात्री पोलिसांच्या वाहनातून वरिल तिघांना माजलगांव येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. विनायक जावळे यांचेवर प्राथमिक उपचार करून बीड येथे हलविण्यात आले आहे. ते शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य आहेत.