सामाजिक न्यायाच्या भावनेतून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्नांना न्याय दिला पाहिजे",


"सामाजिक न्यायाच्या भावनेतून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्नांना न्याय दिला पाहिजे",
-मा,जगदीश हिरेमणी,सदस्य,राष्ट्रीय सफाई आयोग,नवी दिल्ली,
सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सामाजिक भावनेतून विचार करून,व शासन निर्णय,वस्तुस्थितीचा विचार करून जलदरीत्या निराकरण करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिक काळ प्रलंबित न ठेवता त्यांना जलदरीत्या न्याय दिला पाहिजे असे प्रतिपादन मा,जगदीश हिरेमणी यांनी केले,
पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्ना संदर्भात आज व्ही व्ही आय पी विश्रामगृह, पुणे १,येथे मा,जगदीश हिरेमणी यांचे अध्यक्ष ते खाली बैठक संपन्न झाली,
याप्रसंगी घनकचरा विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोलक,आरोग्यप्रमुख डॉ, रामचंद्र हंकारे,मुख्यलेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर,मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौडकर,उपायुक्त सुनील इंदलकर,माधव जगताप,अरुण खिलारी, दयानंद सोनकांबळे अन्य अधिकारी व कर्मचारी,तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे केंद्रीय महामंत्री डॉ,सुधाकर पनीकर, पुणे मनपा समन्वय समिती सदस्य दीपक निनारिया, प्रताप सोळंकी, नंदू लाल निहारिया,तसेच सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते,
बैठकीपूर्वी मनपाचे अतिरिक्त मनपा आयुक्त मा,शांतनू गोयल यांनी मा,जगदीश हिरेमणी यांची भेट घेउन मनपाचे सफाई कर्मचारी प्रश्ना संदर्भात चर्चा केली,
बैठकीत चर्चा करताना मा,जगदीश हिरेमणी यांनी सांगितले कि, मनपातील सफाई कर्मचारी यांचेकडून पुणे शहर स्वच्छ राखण्यात मोठे योगदान आहे,शहरातील स्वच्छता करताना स्वताच्या शरीराकडे दुर्लक्ष करून सफाई कर्मचारी अनेक समस्यांना तोंड देत शहर स्वच्छ राखण्याकरिता अहोरात्र कष्ट करीत असतो,त्यामुळे त्यांच्या न्याय प्रश्नांना सामाजिक न्यायाचे भूमिकेतूनपाहुन न्याय दिला पाहिजे,
सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,ग्रेड पे,अन्य आर्थिक लाभ,आरोग्य सुविधा,संरक्षक साहित्याचा पुरवठा,मिळालेल्या साहित्याचा वापर,सफाई कर्मचार्याची घरे मालकी हक्काची करून देणे,अवलंबिताना, वारसांना शासन निर्णयानुसार न्याय देणे, केंद्र-राज्य शासनाकडून मिळणारणा निधी,शासन निर्णय,अंदाजपत्रक तरतुदी,यांचा सफाई कर्मचारांचे प्रश्नांकरिता,विकासाकरिता खर्च झाला पाहिजे,प्रलंबित प्रश्नांकरिता जलदरीत्या निराकरण होणेकरिता सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी ,संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित बसून प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे,असे सांगितले,
बैठकीप्रसंगी प्रास्ताविक,सुत्रसंचलन,व आभार प्रदर्शन मा,ज्ञानेश्वर मोलक यांनी केले,
-----------------
"स्वच्छता अभियानात पुणेकरांचा सहभाग कौतुसकास्पद",
पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लॉगेथॉन स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या  पुणे शहरातील विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी,स्वयंसेवी संस्था,शासकीय अधिकारी,कर्मचारी,मनपाचे अधिकारी कर्मचारी,यांचा लक्षणीय सहभाग व शहरातील स्वच्छता पाहून खऱ्या अर्थाने पुणेकरांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले,
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य मा,जगदीश हिरेमणी आज पुणे मनपा सफाई कर्मचारी प्रश्नांचे संदर्भात बैठकीकरिताआले होते,
आजच्या प्लॉगेथॉन उपक्रमास त्यांनी भेट देउन पाहणी केली,
पुणे मनपाने आयोजित केलेले प्लॉगेथॉन स्वच्छता अभियानाचा उपक्रम अत्यंत अभिनव व महत्वाचा असल्यामुळे व नागरिकांनी घेतलेला सहभाग कौतुकाचा असून नागरी सहभाग वाढणेकरिता हे अभियान कायमस्वरूपी चळवळ झाली पाहिजे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले,