आनंद ग्रुपच्यावतीने राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या राजकीय कारकीर्दीस २५ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल,विधानपरिषदेच्या पहिल्या महिला सभापति झाल्या बद्दल व धन्वंतरी पुरस्कार प्राप्त वैदय सदानंद सरदेशमुख यांचा सत्कार करण्यात आला.शाल,श्रीफळ,गणेश मूर्ति व प्रतिमा असे सत्काराचे स्वरूप होते. संकल्प मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आनंद ग्रुपचे संस्थापक आनंद रेखी,खा.गिरीश बापट,आ.महेश शिंदे,नगरसेवक कुंदन गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात डॉ.धर्मेंद्र शहा,शिवाजी भोसले आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना विधानपरिषद उपसभापति डॉ.निलमताई गो-हे यांनी निरोगी आयुष्यासाठी होमिओपॅथी –आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींनी समन्वयाने काम करावे.तसेच लोकांच्या प्रबोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.श्रीपाद नाईक यांनी हा सत्कार गोव्यातील जनतेस अर्पण केला.सत्काराने आगामी कार्यास बळ येते असे संगितले.
छायाचित्र :डावीकडून आनंद रेखी,श्रीपाद नाईक,निलमताई गो-हे,गिरीश बापट,सदानंद देशमुख,महेश शिंदे,अभिनंदन थोरात.