पानिपतच्या तिस-या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाला .

पानिपतच्या तिस-या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाला . पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं.


'हर हर महादेव'चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज.... मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या 'पानिपत' सिनेमाचा ट्रेलर जसा प्रदर्शित झाला अन् सर्वत्र या सिनेमाविषयी चर्चा, त्याचे कौतुक झाले आणि सिनेमाविषयी असलेली उत्सुकता अनेकांनी दर्शवली.  'मराठा... भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.' असं म्हणत सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होती. आणि आपण प्रत्येक दृश्यागणिक जणू पानिपतच्या रणभूमीत हजर झालो आहोत असा जिंवत आभास निर्माण केला आहे. ट्रेलरनंतर या सिनेमातील कलाकार, गाणी एक-एक करुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. 


ज्या युध्दाची गोष्ट वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचली ते युध्द आता मोठ्या पडद्यावर पाहण्यास्  मिळाल्याने,चित्रपटाबाबत सिनेरसिकांन मध्ये उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत.  'पानिपत'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले असून,कलाकार अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनिश बहल, यांच्या प्रमुख भुमिकेने चित्रपट रोचक झाला आहे. अजय-अतुल यांचे सुमधूर संगीत लाभल्याने,गाण्याऱ्यांना रंगत आली. 


मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसले. अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका संजय दत्त यांनी साकारली आहे. तसेच, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भुमिका होत्या