नागरिकत्व संशोधन कायद्याच्या सन्मानार्थ कार्यक्रमात पोलीस बांधवांचा सन्मान भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी मानले देशातील पोलीस बांधवांचे आभार


नागरिकत्व संशोधन कायद्याच्या सन्मानार्थ कार्यक्रमात पोलीस बांधवांचा सन्मान 


भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी मानले देशातील पोलीस बांधवांचे आभार


पिंपरी दि.२२ (प्रतिनिधी) - देशात सध्या नागरिकत्व संशोधन कायदा पारित करण्यात आला त्याचे देशातील विविध भागात अनुचित प्रकार घडले खुप ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली हे रोखताना अनेक पोलीस बांधवांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यात कित्येक पोलीस बांधव जखमी झाले, त्यामुळे संपुर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, याचीच दखल घेत निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी देशातील पोलीस बांधवांच्या कार्यासाठी व सन्मानासाठी पिंपरी येथील कार्यक्रमात गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार व्यक्त करत आंदोलनाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांना देश तुमच्या पाठीशी आहे, आत्मविश्वास कमी पडु न देता कडक पावले उचलण्याची भावना यावेळी निगडी भाजपच्या वतीने व्यक्त केली. 


देशातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी आपले सौनिक व पोलीस बांधव जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात, पण काही अनुचित प्रकारामुळे त्यांचे मनोबल कमी होते अशा वेळी शासनाने व देशातील प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची नितांत गरज असते, या भावनेतून पिंपरी येथील नागरिकत्व संशोधन कायदा सन्मानार्थ कार्यक्रमात पोलीस बांधवांचा गुलाबपुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.


यावेळी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे, सचिन गुंजाळ, आकाश दळवी, राहुल कुसाळकर, अजय कंट्रोलु, राजन गुंजाळ, राकेश बावणे, धनंजय सगट हे उपस्थित होते.