शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणेशौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंद

🅾🅾 *ब्रेकींग न्यूज*🅾🅾
*शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी*


*मुंबई :-एक जानेवारी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान त्यांना पुणे जिल्ह्यात राहण्यास मनाई करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा या ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून आदेश काढण्यात येणार आहे. १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक कोरेगाव-भीमा या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठीच नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतं आहे.*


*रविवारी पुण्यात याबाबत बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकबोटे आणि भिडे यांना जिल्हा बंदी करणार असल्याची माहिती दिली.*


*हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यासह एकूण १६३ जणांना पुण्यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.*


*भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.*