*महाबळेश्वर मध्ये सिएए व एनआरसी विरोधात तीव्र निषेध मोर्चा*

*महाबळेश्वर मध्ये सिएए व एनआरसी विरोधात तीव्र निषेध मोर्चा*
महाबळेश्वर : दि.२४.१२.२०१९ (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) केंद्र सरकारने लागू केलेल्या सिएए व एनआरसी कायद्याविरोधात महाबळेश्वर वासीयांनी भव्य निषेध मोर्चा काढला होता.यामध्ये सर्व पक्ष संघटनांचा सक्रिय सहभाग होता.मोर्चाची सुरुवात महात्मा फुले व छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छ. शिवाजी सर्कल येथून करण्यात आली.हा मूक मोर्चा हातात निषेधाचे फलक व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे पोस्टर घेऊन मुख्य बाजारपेठेतून शांततामय रित्या नेताजी सुभाष चौक येथे आला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.नेताजी सुभाष चौक येथे सर्व मोर्चेकरी एकत्र जमले यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, शिवसेना सातारा जिल्हा उपप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख,बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी आपापले निषेधपर विचार मांडले.पुढे हा विराट मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला.तहसीलदार महाबळेश्वर यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला. या मोर्चात उपनगराध्यक्ष अफजल सुतार,माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे,नगरसेवक संदीप साळुंखे,विशाल तोष्णीवाल,तौफिकभाई पटवेकर,जावेद वलगे,आसिफ मुलाणी,ख्वाजा वारुणकर,बाळासाहेब कोंढाळकर,राजू गुजर,समीर सुतार,मोजम नालबंद,राजुशेठ राजपुरे,पंचायत समिती सदस्य संजय गायकवाड,नगरसेवक प्रकाश पाटील,दत्ता वाडकर,रोहित ढेबे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन फकीर वलगे यांनी केले