यावेळी छावा कामगार युनियनच्या पदाधिकऱ्यांना विविध पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

खुलताबाद, भद्रा मारूती, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे आपल्या  छावा कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिनकर कोतकर यांच्या सूचनेनुसार व प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनानुसार


*गौरव जोंधळे खुलताबाद तालुका अध्यक्षपदी, अनिल सपकाळ खुलताबाद शहर प्रमुखपदी, संतोष चव्हाण खुलताबाद तालुका सचिवपदी, संदीप जाधव वाळुंज महानगर प्रमुखपदी, जयराम जाधव संभाजी नगर शहर सचिवपदी, राकेश वाघे पैठण तालुका अध्यक्षपदी, मनोज जाधव खुलताबाद तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती औरंगाबाद शहर अध्यक्ष श्री मक्खनसिंग यांच्या हस्ते करण्यात आली.*


नियुक्तीच्या वेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना छावा कामगार युनियनचे लोगो व पुस्तके देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


सदर प्रसंगी छावा कामगार युनियनचे


संस्थापक अध्यक्ष श्री दिनकर कोतकर, प्रदेश संपर्क प्रमुख श्री राजेंद्र कुचेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री महादेव गोरखे इत्यादी उपस्थित होते.


यावेळी छावा कामगार युनियनच्या पदाधिकऱ्यांना विविध पदाच्या  नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.