पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सातवा वेतन आयोगाला नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सातवा वेतन आयोगाला नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाली.


     राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नातून तसेच पिंपरी ‍विधानसभेचे आमदार श्री. अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे पाटील व  पदाधिकारी यांच्या माध्यमातून सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिके मधील एकूण सात हजार नऊशे पंचावन्न (७९५५) कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष वेतनात लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेतील सर्व कर्मचारा-यांच्या वेतनात सरासरी १७ ते २२ टक्के इतकी वाढ होणार आहे.

गटकामगार संख्याØ  सध्याचे मासिक वेतन – ३६ कोटी

८३Ø  आयोगामुळे होणारी वाढ – ४४ कोटी

२१७Ø  महापालिकेच्या अस्थापना खर्च – ८ कोटी वाढ

३८६०Ø  सेवानिवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन – १.३१ कोटीड (इतर)१९६३Ø  महापालिकेचा सध्याचा अस्थापन खर्च – २७.११ड (सफाई)१८३२Ø  वेतन आयोगासाठी तरतूद८० कोटीएकूण७९५५Ø  वेतनवाढीची सरासरी- १७ ते २२ टक्के 


महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर श्री. अजितदादा पवार पहिल्यांदा शहरात दिनांक १४ डिसेंबर रोजी पक्षाच्या बैठकीत आल्यानंतर त्या बैठकीत सदरचा विषय आपण मार्गी लावू अशा प्रकारचे सूतोवाच त्यांनी केल्यानंतर एका आठवड्यात हा ज्वलंत प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा आनंदोत्सव पसरलेला आहे. बोले तैसा चाले या म्हणीनुसार दादांनी आपला शब्द पुर्ण केलेला आहे.


राज्य शासनाकडून सातवा वेतन आयोगाला मंजुरी मिळालेले पत्र आज महानगरपालिकेत आयुक्तांना देण्यात आले, त्यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार मा. अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे पाटील, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, यागेश बहल, मंगलाताई कदम,महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत ‍शितोळे, नगरसेवक मयुर कलाटे, राजू मिसाळ, स्वाती माई काटे, गिता मंचरकर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी, निलेश पांढारकर, विशाल काळभोर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे कामगार नेते अंबर चिंचवडे, संभाजी पारटे तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.