*आरोग्यसंपन्नता,शरीराची आंणि मनाची सुद्धा*🤷🏻♂
पुण्यनगरीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामधे,दैनंदिन अनेक समारंभ साजरे होत असतात परंतू काही कार्यक्रम हे संयोजक आणि पाहुणे, वक्ते यांच्या निखळ पारदर्शी आणि नीतिमत्तापूर्ण संवादातून, उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतात !
डाॅ दिलीप देवधर, डाॅ अविनाश भोंडवे आणि सूर्यकांत पाठक,या त्रयीने,नुकत्याच योजलेल्या टाॅक शो मधे,हीच बाब लक्षणीय ठरली.
फॅमिली डॉक्टर या दोन शब्दांमधे, विज्ञान आणि श्रद्धेचा, अनोखा मिलाप आढळतो. स्वातंत्र्योत्तर काळात, किमान पन्नास वर्षे, या सेवा संकल्पनेने, वैद्यकीय व्यवसायाचा लौकीक अबाधित ठेवला होता परंतू अलीकडच्या दशकात हे क्षेत्र देखील, अर्थकारणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. व्यवसायाचा 'धंदा' न करणारी दुर्मीळ माणसे, त्यामुळेच लौकीकप्राप्त ठरतात.
आपल्याच व्यवसायातील दुष्प्रवृत्ती,धोक्याची वळणे आणि चुकीच्या प्रथांवर प्रहार करणे हे धारिष्ट्याचे असते परंतु डाॅ दिलीप देवधर हे व्रत , अनेकवर्षे सातत्याने करीत आहेत.
वैद्यकीय ज्ञान, संवाद कौशल्य आणि लेखणीच्या माध्यमातून,जनप्रबोधनाचे हे कार्य अखंडपणे चालूच आहे.
टाॅक शो हे अलीकडच्या काळात,अभिनिवेश आणि नकारात्मकतेच्या गर्तेत अडकलेले असताना, ग्राहकपेठेचा हा उपक्रम, कौतुकास्पद आणि आनंददायी वाटला
आरोग्यसंवादाचे हे कार्य, सर्वव्यापी व्हावे हीच सदिच्छा !
आरोग्यसंपन्नता,शरीराची आंणि मनाची सुद्धा*🤷🏻♂