पर्यवेक्षणाशिवाय नऊ तासांत नऊ लाखांचे उरकले काम  रस्त्याची गुणवत्ता व अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता  संशयास्पद ; रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीकडे तक्रार
पर्यवेक्षणाशिवाय नऊ तासांत नऊ लाखांचे उरकले काम 

 

रस्त्याची गुणवत्ता व अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता 

संशयास्पद ; रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीकडे तक्रार

 

कर्जत दि. 20  गणेश पवार

     जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत पोशीर प्रवेश रस्त्याचे नऊ लाखाचे काम क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाशिवाय अवघ्या नऊ तासांत रात्रीचादिवस करून पूर्ण करण्यात आले. तरतूद मान्यता व प्रशासकीय मान्यतेतील नियम धाब्यावर बसवून हे काम इतक्या घाईत का उरकण्यात आले याबद्दल संशय वाढला आहे. तसेच या रस्त्याची गुणवत्ता व अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता 


संशयास्पद असल्याचे समोर आले आहे.


       पोशीर गावातील या मुख्य रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या जून 2019च्या बैठकीत मंजूर करण्यात आले. या कामाकरिता जनसुविधा अंतर्गत विशेष अनुदान योजनेतून 9 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व त्याकरिता आवश्यक इ निविदा, प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक त्या बाबींची 'विधी 'वत पूर्तता करून भूमिपूजन विधी पार पडला तत्पूर्वी अवघा एक दिवस आधी या रस्त्यावर खडी पडली होती मात्र हि खडी रस्त्यावर पसरण्याआधी जुने कालबाह्य काँक्रीट खोदून रस्ता समतल करणे आवश्यक होते.ठेकेदाराने ती खबरदारी न घेता  समपातळी न करता तशीच खडी पसरल्याने या रस्त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित झाल्या होत्या.  या रस्त्याच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या नागरीकांना व्यवस्थित माहिती न देता चुकीची माहिती उपअभियंता देशमुख यांनी दिली परंतु चौकशीअंती समजले कि या कामाचे नियंत्रण हे उपअभियंता पंचायत समिती कर्जत यांच्याकडे आहे. त्यांनतर त्यांना हे काम निकषांनुसार न होता चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर सदर काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले .

     मात्र कोणत्याही परिस्थितीत काम घिसाडघाईत आजच  पूर्ण करायचे असे ठेकेदारानी ठरवल्याने काम रात्री 8:30वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले. हे काम सुरू असताना उपअभियंता अथवा अन्य कुणी जबाबदार अधिकारी तिकडे का फिरकला नाही याबाबत  देशमुख यांना विचारले असता त्यांना उद्या सकाळी माझ्या देखरेखीखाली काम सुरू करायला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले .

    शुक्रवारी रात्रीच काम पूर्ण झाल्यानन्तर या उपभियंता महाशयांनी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी भेट देऊन झालेल्या कामाची मोजणी केली. याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी असून या कामाची पूर्ण चौकशी व कामाची पूर्तता करून घेतल्याशिवाय ठेकेदाराना पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये तसेच कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर काम ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली होणे अपेक्षित होते त्या अधिकाऱ्यांनी तक्रार होऊनदेखील कर्तव्यतत्परता न दाखवता उलट कमालीचा निष्काळजीपणा दाखवल्याने या जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .तसेच ठेकेदार अशा घाईगडबडीत कामे उरकणार असतील कामाचा दर्जा कसा राखला जाईल असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

 

चौकट

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर रस्त्याचे काम थांबवा आम्ही आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या देखरेखीखाली काम सुरू करा असे ठेकेदाराला सांगितले होते.  परंतु त्यांनी आदेश न जुमानता काम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले. हे चुकीचे आहे. या संदर्भात आम्ही वरिष्ठांना काळविणार आहोत.

     - गुलाबराब देशमुख

ज्युनियर इंजिनियर बांधकाम विभाग पंचायय समिती

 

 

चौकट 

जुन्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारे खोदकाम न करता खडी टाळून काँक्रीटीकरण केले, तर काही ठिकाणी खडी देखील न टाकता घाईघाईत काँक्रीटीकरण केले आहे. कोणतेही अधिकारी काम सुरू होण्यापूर्वी फिरकले नाही. काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिरवायला आले. ठेकेदार जर अशा घाईघाईत काम उरकरणार या असतील कामांचा दर्जा कसा राखला जाईल, या रस्त्या संदर्भात आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. 

- गणेश माळी

ग्रामस्थ; पोशीर

फोटो ओळ

छाय ः  गणेश पवार