विसाव्या काव्य सप्ताहाचे उद्घाटन* .........................................

 


*विसाव्या काव्य सप्ताहाचे उद्घाटन*
.........................................


पुणे:


'कविता प्रेमिकांचा वार्षिक आनंदोत्सव' अशी ख्याती असलेल्या ' काव्य सप्ताह' या उपक्रमाचे आज ज्येष्ठ छायाचित्रकार दिलीप गोडे यांच्याहस्ते प्रारंभ झाला.
ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य हे या काव्य सप्ताहाचे संस्थापक , संयोजक आहेत. या उपक्रमाचे हे विसावे वर्ष आहे.


25  ते 31 डिसेंबर दरम्यान स्काऊट ग्राउंड येथे हा काव्य सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यात काव्य विषयक विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


आज पहिल्या दिवशी 'नक्षत्रांचे ठसे' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन, स्वाती दाढे आणि गायिका नेहा देशपांडे सहभागी झाल्या. यावेळी राजेंद्र देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्र संचालन दीपाली दातार यांनी केले.


बुधवार,२६ डिसेंबर रंगभरती(कविसंमेलन),२७ डिसेंबर' गप्पा आणि गिरसप्पा' (प्रभा सोनवणे यांची मुलाखत व त्यांचे कवितावाचन,संवादक :ज्योत्स्ना चांदगुडे,मोहिनी कनकदंडे,रमेश वैद्य),२८ डिसेंबर, रोजी' आवाज माणसाचा' (आनंद कुलकर्णी यांची काव्यमैफल) ,
२९ डिसेंबर 'ओंजळ.. अर्धी भरलेली' (स्वाती यादव,मीरा शिंदे)
३० डिसेंबर रोजी,'गप्पा आणि गिरसप्पा' (माधव हंडेकर यांची
मुलाखत , कवितावाचन,संवादक : मृणालिनी कानेटकर, धनंजय
तडवळकर, रमेश वैद्य)
३१ डिसेंबर रोजी 'अक्षर नक्षी' हे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
......................


................................................