जुगाड मराठी चित्रपटाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मावळ येथे पोस्टर लाँच *

माज चित्रपटाच्या यशानंतर निर्माते संदीप टकले यांचे  जुगाड या  मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाच्या भूमिकेत


    * जुगाड मराठी चित्रपटाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मावळ येथे पोस्टर लाँच *


पुणे- माज या २ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाच्या यशानंतर माज चित्रपटाचे निर्माते संदीप टकले आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार असून लवकरच ते  अनुष्का इमॅजिन फिल्म्सच्या जुगाड या  मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करणार आहेत. पुण्यातील  मावळच्या कान्हे फाटा येथील हॉटेल साई अनुष्का येथे ,नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व संदीप टकले यांच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का फिल्म्स निर्मित जुगाड या मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप टकले,सहनिर्माते विजय दळवी व विविध मान्यवर उपस्थित होते .दिग्दर्शक संदीप टकले यांच्या वाढदिवसानिमित्त जुगाड या चित्रपटाची घोषणा केली आहे.


              माज या चित्रपटाच्या यशस्वी प्रवासानंतर  निर्माते व दिग्दर्शक संदीप टकले आता जुगाडाच्या तयारीत आहेत.या निमित्त पत्रकारांशी  बोलताना संदीप टकले म्हणाले कि ,"मनुष्याचे जीवन धावपळीचे आहे ,व्यस्त  जीवनामध्ये मनुष्य आपल्या मनोरंजनासाठी चित्रपट पाहण्यासाठी जातो. त्यामुळे त्याच्या मनोरंजनासाठीच मराठी चित्रपट करायचे ठरविले.अनेक अडचणींना तोंड देत माझा चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरु आहे . माज चित्रपटाच्या निर्मितीच्या जुगाडानंतर या जुगाड चित्रपट दिग्दर्शन करण्याचे ठरले. ड्राइव्हर म्हणून मी करिअरला सुरुवात केली होती कधी कुणाचे नुकसान करायचे नाही हे मनापासून ठरविले होते प्रत्येक चित्रपट हा एक स्वतःचे नशीब घेऊन येतो या चित्रपटाचे काही शूटिंग मॉरिशस येथेही करण्याचा विचार आहे .सध्या मराठी चित्रपटांचे नियोजन व्यवस्थित होत नाही.त्यामुळे सध्या ४५०० मराठी  चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेले नाहीत.त्यामुळे निर्मात्यांची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सतत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.जेणेकरून निर्माता जगेल व चांगले चित्रपट तयार होतील." विजय दळवी म्हणाले कि "मराठी चित्रपट बनविण्यापेक्षा तो प्रदर्शित करणे मोठे व आव्हानात्मक काम आहे "


               अनुष्का इमॅजिन फिल्म्स या संस्थेकडून चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे संदीप टकले हे एक हॉटेल व्यावसायिक आहेत. एक छंद म्हणून त्यांनी मराठी चित्रपट निर्मितीचे पाऊल धाडसाने उचलले आहे..चित्रपटातील कलाकारांची नावे  अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत .सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलेल्या पोस्टरवरून जुगाड हा चित्रपट पैशाचा व्यवहार आणि त्यानंतर होणारी पळापळ यावर आधारित असल्याचे जाणवतं.लवकरच आता या  चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.