सुरक्षा काढून घेण्याची अण्णा हजारेंची मागणी ;  मुख्यमंत्र्यांना पत्र

सुरक्षा काढून घेण्याची अण्णा हजारेंची मागणी ;  मुख्यमंत्र्यांना पत्र
____________________________________


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा राज्य सरकोरने निर्णय घेतलेला असताना हजारे यांनी मात्र आपली सुरक्षाच कोढून घेण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाक रे यांना शुक्रवारी पाठविले आहे.'आपणास देण्यात आलेल्या सुरक्षेवर मोठा खर्च होतो. जनतेचा पैसा आपल्या सुरक्षेवर खर्च होऊ नये, त्यामुळे वेदना होतात. म्हणून ही सुरक्षा कोढून टाक ण्यात यावी. माझ्या बाबतीत एखाद्या वेळी नको अशी घटना घडली तरी मी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा काढण्यास लेखी स्वरुपात सांगितले असल्याने सरकोरवर कोणतीही जबाबदारी येणार नाही. ज्यांना सुरक्षा क मी पडते अशा लोकोंना ती देण्यात यावी,' अशी विनंती असल्याचे अण्णांनी या पत्रात म्हटले आहे.आपल्या पत्रात हजारे पुढे म्हणतात, कोही स्वार्थी माणसं आमच्या आंदोलनामुळे दुखावली गेली आणि बारा वेळा मला माझी हत्या क रण्याच्या धमक्या आल्या. कॅनडामधूनही एक  धमकी आली. एकेकाळी राज्याचे मंत्रीपद भूषविणारे पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या बरोबर अण्णा हजारे  यांची हत्या क रण्याची सुपारी दिल्याचे आरोपी परसमल जैन याने न्यायालयासमोर सांगितले. पोलिसांत तक्रार के ल्यानंतर पद्मसिंह पाटील यांना अटक  झाली. हा खटला अद्यापही सुरू आहे.'१९६५ मध्ये खेमक रण सीमेवर भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शत्रूच्या हल्लय़ात माझे सर्व सहकोरी शहीद झाले आणि मीच वाचलो. त्या वेळीच माझी मरणाची भीती गेली असल्याने मी मरणाला व धमक्यांना घाबरलेलो नाही. नैसर्गिक आजाराने मरण्यापेक्षा समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करता मरण आले तर ते माझे भाग्य असेल अशी माझी धारणा झालेली असल्याने मी क धीही सरकोरक डे संरक्षण मागितलेले नाही. परंतु वेळोवेळी माझी हत्या क रण्याच्या येणाऱ्या धमक्यांमुळे  सरकारने मला सुरक्षा दिली. सुरक्षा घेणे योग्य वाटले नाही म्हणून सरकोरला चार वेळा सुरक्षा कोढून घेण्यासंदर्भात पत्र लिहिली, मात्र सुरक्षा कोढली गेली नाही.' असेही त्यांनी म्हटले आहे.