परिवहन सेवेच्या १० तेजस्विनी बसेस २५ डिसेंबर पासून शहरातील विविध १० मार्गावर धावणार

परिवहन सेवेच्या १० तेजस्विनी बसेस २५ डिसेंबर पासून शहरातील विविध १० मार्गावर धावणार


ठाणे शहरातील महिलांना सुखकर व सुरक्षित प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसताफ्यातील १० तेजस्विनी बस दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी पासून शहरातील विविध १० मार्गावर धावणार आहेत. तरी शहरातील सर्व महिला प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे  आवाहन परिवहन विभागाने केले आहे.


      ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्यत्वे सर्व विभागातून सकाळी स्टेशनकडे येणाऱ्या बसेसकरीता व सायंकाळी स्टेशनकडून सर्व विभागात जाणाऱ्या बसेसकरिता प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा सर्व मार्गावर या बसेस चालविण्यात येणार आहेत.


   ठाणे स्टेशनकडे येण्याकरिता सकाळी ७.०० ते १०.०० वाजता व ठाणे स्टेशन येथून जाण्यासाठी १७.०० ते २१.०० या वेळेत सुटणाऱ्या बसफेऱ्या केवळ महिलांसाठी सोडण्यात येणार आहेत. उर्वरित बसफेऱ्या सर्वसाधारण चालविण्यात येणार आहेत.


     महिला प्रवाशांची संख्या ज्या मार्गावर अधिक आहे अशा ठाणे स्टेशन पश्चिम ते वृदांवन सोसायटी, ठाणे स्टेशन पश्चिम ते लोकमान्यनगर, ठाणे स्टेशन पश्चिम ते वागळे आगार, ठाणे स्टेशन पश्चिम ते गावंडबाग, ठाणे स्टेशन पश्चिम ते पवारनगर, ठाणे स्टेशन पश्चिम ते खारेगाव, ठाणे स्टेशन पश्चिम ते कासारवडवली, ठाणे स्टेशन पश्चिम ते धर्माचापाडा, ठाणे स्टेशन पश्चिम ते दादलानीपार्क व  ठाणे स्टेशन पश्चिम ते कोलशेत या १० मार्गावर तेजस्विनी बस चालविण्यात येणार आहे. तरी सर्व महिला प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
 
 Sameer Unhale Sandeep Malvi