राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबरला शिवाजीनगर बसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबरला 
शिवाजीनगर बसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन
                
  पुणे,दि.२१ : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ग्राहकांसाठी विविध विभागांचे वस्तुस्वरुप प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. 
         ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी अन्न, औषध व प्रशासन, पोलीस विभाग, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य, परिवहन विभाग तसेच मोबाईल कंपनी, पेट्रोलियम कंपनी आदी २२ ते २५ विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार असून या प्रदर्शनाचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000