सोलापूरात ५ ठिकाणी होणार शिवभोजन योजना प्रारंभ ..

⭕सोलापूरात ५ ठिकाणी होणार शिवभोजन योजना प्रारंभ ..


सोलापूर : राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी १० रुपयात भोजन देण्यासाठी सोलापूरात या शिवभोजन योजनेची ५ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.सोलापूरात एस.टी. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मार्केट यार्ड आणि कुंभारी येथील आश्विनी हॉस्पिटल येथे शिवभोजनचे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याचेही डाॅ.भोसले यांनी सांगितले.