: ''पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी जोरात तयारी करा आणि महापालिकेतील सत्तेतूनही भारतीय जनता पक्षाला हटवा, अशा शब्दांत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना आदेश देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मिशन पुणे महापालिका' हा नवा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला.

पुणे : ''पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी जोरात तयारी करा आणि महापालिकेतील सत्तेतूनही भारतीय जनता पक्षाला हटवा, अशा शब्दांत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना आदेश देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मिशन पुणे महापालिका' हा नवा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला.


काँग्रेससोबत सूर जुळण्यात 'या' गांधींचा मोठा वाटा: संजय राऊत


वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या राऊत यांनी शिवसेना भवनात पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.