नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर चालविल्या जाणाऱ्या मिनिट्रेनमधून प्रवाशांना सुखरूप प्रवास घडवून आणण्यात प्रयत्न करणारे हिरू तुकाराम बुंधाटे हे आज मध्य रेल्वे ची 40 वर्षे सेवा करून आज सेवा निवृत्त झाले.या मार्गावर ब्रेक पोर्टर ते डिझेल मॅकेनिक अशी जबाबदारी पार पाडणारे बुंधाटे आज सेवा निवृत्त झाले,मात्र आजच गेली सहा महिने बंद असलेली मिनीट्रेन पुन्हा सुरू झाली आहे.हा योगायोग जुळून आला असल्याचे मत कामगार नेते राजेंद्र साळोखे यांनी मांडले.
कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील रहिवाशी असलेले हिरू तुकाराम बुंधाटे हे 1979 मध्ये मध्य रेल्वे च्या सेवेत लागले.त्यांची पहिली सेवा नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन वर मिनीट्रेन मधून प्रवास करणारे प्रवासी यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून काम करणारे ब्रेक पोर्टर म्हणून काम सुरू केले.त्यानंतर मागील 40 वर्षे याच नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर ते सेवा बजावत होते आणि त्यांनी ब्रेक पोर्टर ते खलाशी आणि पुढे सेवा निवृत्त होताना डिझेल मॅकेनिक ग्रेड तीन अशी बढती त्यांना आपल्या 40 वर्षाच्या सेवेत मिळाली आहे. त्यांचे 40 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर आज 27 डिसेंबर रोजी ते सेवा निवृत्त झाले असून त्यांचा नेरळ येथोल लोको कार्यशाळेत सहकारी कर्मचारी यांनी सत्कार केला.
त्यावेळी नेरळ लोको चे अभियंता सक्सेना,परमार, कामगार नेते राजेंद्र साळोखे, यांच्यासह त्यांचे सहकारी राहिलेले मोटारमन सुनील मिसळ,तसेच शंकर पगारे,राजेश कोकाटे,यांच्यासह दत्तू लोंगले,टी बाळू,भरत भिवा,सदाशिव लोभी,सदू वाघ,दत्तू लोभी आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.कामगार नेते राजेंद्र साळोखे यांनी यावेळी बोलताना हिरू बुंधाटे यांनी 40 वर्षे सेवा केली आणि ते निवृत्त होत असताना नेरळ-माथेरान मार्गावरील मिनिट्रेन देखील सुरू होत आहे.हा योगायोग बुंधाटे यांनी 40 वर्षे रेल्वे ची सचोटीने सेवा केल्याचा पुण्याचा भाग आहे असे आपण मानतो.पुढे बोलताना त्यांनी गेली सहा महिने मिनिट्रेन बंद होती आणि बुंधाटे निवृत्त होत असताना मिनिट्रेन ची प्रवासी सेवा सुरू होत आहे हा देखील योगायोग आहे असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.यावेळी राजेश कोकाटे यांनी आमच्या मॅकेनिक स्टाफ मध्ये सर्वांना प्रेमाने वागविणारे हिरू बुंधाटे असल्याने त्यांची कमी आम्हाला यापुढे जाणवणार आहे असे स्पष्ट केले.
फोटो ओळ
नेरळ रेल्वे कर्मचारी सेवा निवृत्त
छाय ः गणेश पवार