नेरळ मध्ये क्रिकेटपटूना मोठे व्यासपीठ... नेरळ प्रीमियर लीगचे आयोजन सलग चौथ्या वर्षात

 


नेरळ मध्ये क्रिकेटपटूना मोठे व्यासपीठ...

नेरळ प्रीमियर लीगचे आयोजन

सलग चौथ्या वर्षात

कर्जत,दि .24  गणेश पवार

               नेरळ शिवसेना शाखेच्या पुढाकाराने नेरळ मधील क्रिकेट खेळाडूंसाठी नेरळ प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे.नेरळ प्रीमियर लीग चे हे चौथे वर्षे असून यापूर्वी मंगेश म्हसकर मित्र मंडळाने नेरळ प्रीमियर लीग चे आयोजन केले होते.नेरळ मधील 10 व्यावसायीक संघ स्पर्धेत उतरणार असून 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत कोतवालवाडी ट्रस्ट च्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली आहे.

                             नेरळ प्रीमियर लीग मध्ये नेरळ डेअर डेव्हील, नेरळ वॉरीअर,नेरळ सुपरकिंग,नेरळ चॅलेंजर्स,नेरळ इंडियन,नेरळ लायन्स,नेरळ किंग11,नेरळ रॉयल,नेरळ सनराईज आणि नेरळ नाईट रायडर्स हे संघ सहभागी होत आहेत.यावर्षी ही स्पर्धा नेरळ शिवसेना शहर शाखा आयोजित करीत असून स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.स्पर्धेचे धावते समालोचन आणि प्रेक्षपण यु ट्यूब वर आणि टेनिस क्रिकेट डॉट कॉम वर केले जाणार आहे.दोन गटात ही स्पर्धा प्रथम साखळी पद्धतीने आणि नंतर बाद पध्दतीने खेळविली जाणार आहे.मैदानात खेळाडुंसाठी विश्रांती बॉक्स,प्रेक्षकांसाठी गॅलरी,ची व्यवस्था आहे.

                                त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे,स्थानिक आमदार महेंद्र थोरवे,मुंबई चे माजी महापौर दत्ता दळवी,माजी आमदार मनोहर भोईर,तसेच वरून सरदेसाई, मयूर जोशी,वैभव परब यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. स्पर्धेचे आयोजन करण्यात शिवसेनेचे नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे,नेरळ चे सरपंच रावजी शिंगवा आणि युवासेनेचे पदाधिकारी प्रथमेश मोरे आणि नेरळ शहर शाखा तयारी करीत आहेत.