पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे (लघुपट व माहितीपट) 27 डिसेंबर  2019 रोजी पुण्यात उद्‌घाटन.

 


पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे (लघुपट व माहितीपट)


27 डिसेंबर  2019 रोजी पुण्यात उद्‌घाटन.


* अष्टविनायक मोशन फिल्मस ,प्रयोग कलाकृती व एम आय टी वर्ल्ड पीस


युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त वद्यमाने


फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे (लघुपट व माहितीपट) दि. 27 ते 29
डसेंबर 2019 रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पस येथे


आयोजन*


पुणे :- अष्टविनायक मोशन फिल्मस, प्रयोग कलाकृती व एम आय टी वर्ल्ड पीस
युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्तवद्यमाने पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय
महोत्सवाचे (लघुपट व मािहतीपट) महोत्सवाचे आयोजन दि. 27 ते 29डसेंबर
2019 रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पस येथे करण्यात
आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन दि.27 डिसेंबर रेाजी स.11 वाजता अखिल
भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, राष्ट्रीय पारितोषिक
वजेत्या चित्रपट म्होरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर ,विविध महोत्सवातील
पारितोषिक विजेत्या  कॉपी  चित्रपटाचे  दिग्दर्शक दयासागर वानखेडे या
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत फिल्मफ्रेम
आंतरराष्ट्रीय महोत्सव (लघुपट व मािहतीपट) च्या आयोजकांनी दिली.
याप्रसंगी फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय चित्रपट (लघुपट व मािहतीपट) महोत्सवाचे
संचालक योगेश शर्मा एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मिडिया
अँड फाईन आर्टस चे संचालक व महोत्सवाचे समन्वयक मकरंद माळवे, महोत्सवाचे
समन्वयक अश्विन शर्मा, महोत्सवाचे प्रसिध्दीप्रमुख प्रशांत निकम उपस्थित होते.


या महोत्सवामध्ये भारतातील तमिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ,
गुजरात, जम्मू कशमीर, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब,
हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यातील लघुपट व
मािहतीपट सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर जगभरातील नेदरलॅंड, बेल्जीयम,
इराण, अमेरिका,ब्रटन, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना , पोलंड, स्पेन, पोर्तुगाल,
क्युबा, इटली, आइसलँड, सिंगापूर, नॉर्वे, साऊथ कोरिया, श्रीलंका, साऊथ आफ्रिका ,
तुर्की, व्हिएतनाम, इस्त्रायल,  केनिया, पेरू, चीन, जपान, रशिया, इजिप्त, ग्रीक,
स्वित्झर्लंड, कोलंबिया , हंगेरी, बांग्लादेश, ऑस्ट्रिया   आदी 65 पेक्षा जास्त
देशातील लघुपट व माहितीपट सहभागी झाले आहे. या अांतरराष्ट्रीय महोत्सवात
(लघुपट व माहितीपट) 350 लघुपट व माहितीपटांची  नोंदणी झाली होती. त्यापैकी
152 लघुपट व माहितीपट महोत्सवाच्या स्पर्धेच्या स्क्रीनिंगसाठी  निवड करण्यात
आली आहे.
                या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये (लघुपट व माहितीपट)विविध फिल्ममेकर
साठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये लघुपट
निर्मिती , संहिता लेखन व लघुपट, माहितीपटांची  तांत्रिक बाबीवरील मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. यामध्ये दिग्दर्शक अमर देवकर,दिग्दर्शक  दयासागर
वानखेडे,दिग्दर्शक  देवेंद्र जाधव,निर्मात्या  विजयालक्ष्मी जाधव फिल्ममेकर्सला
मार्गदर्शन करणार आहे.
या नवोदित (पहिल्याच ) आंतरराष्ट्रीय महोत्सवात (लघुपट व मािहतीपट)
जगभरातील जास्तीत जास्त देशांनी सहभाग नोंदिवला आहे. त्यामुळे हा महोत्सव
जागतिक विक्रम स्थापित करत आहे. या संदर्भातील नोंदणी आम्ही इंडिया  बुक
ऑफ रेकॉर्ड, लिंम्का बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी
करणार आहोत. अशी माहिती   महोत्सवाचे संचालक योगेश शर्मा यांनी दिली.
या महोत्सवामध्ये लघुपट (शॉर्ट फिल्म) सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी रू.31000/-,
सन्मानिचन्ह व सर्टिफिकेट ; द्वितीयक्रमांकाच्या लघुपटासाठी रूपये 21000/-,
सन्मानिचन्ह व सर्टिफिकेट ; तृतीय क्रमांच्या मािहतीपटासाठी रूपये 11000/-
सन्मानिचन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट ज्युरी अवार्ड (दोन लघुपट) रूपये 5000/-
सन्मानिचन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोकृष्ट दिग्दर्शकसन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ;
सर्वोकृष्ट दिग्दर्शक(ज्युरी अवार्ड)सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट
सनेमॅटोग्राफी (छायाचत्रण), सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट; सर्वोत्कृष्ट
सनेमॅटोग्राफी (ज्युरी अवार्ड), सन्मानचिन्हव सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट संकलन,
सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट संकलन (ज्युरी अवार्ड), सन्मानचिन्ह व
सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट कथालेखन/पटकथा लेखन, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ;
सर्वोत्कृष्ट बॅगराऊंड स्कोअर सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट अ‌‌भिनेता
(पुरूष), सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (स्त्री), सन्मानचिन्ह व
सर्टिफिकेट; सर्वोत्कृष्ट सहाय्यक अ‌‌भिनेता, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ;
सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट पोस्टर
डिझाईन, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट; सर्वोत्कृष्ट संकल्पना, सन्मानचिन्ह व
सिर्टफिकेट ; माहितीपट (डॉक्युमेंटरी) कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटास रूपये
10000/- सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट, तृतीय क्रमांकाच्या माहितीपटास रूपये
5000/- सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट माहितीपट (ज्युरी ऍवार्ड),
सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ;
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक(ज्युरी ऍवार्ड), सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट
सनेमॅटोग्राफी सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट,सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट ; सर्वोत्कृष्ट
संकल्पना, सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट अशी विविध पारितोिषके ठेवण्यात आली
आहेत.
       या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा (लघुपट व माहितीपट) समारोप व
पारितोषिकवतरण समारंभ दिनांक 29डसेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.00
वाजता विविध   मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे. हो महोत्सव सर्वांसाठी
विनामूल्य  ठेवण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त सिनेप्रेमींनी , पुणेकर
नागरिकांनी विद्यार्थी -विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे
आवाहन आयोजकांनी केले आहे.