माथेरान राणी सज्ज... मिनिट्रेनची शटलसेवा लवकरच पर्यटकांच्या दिमतीला 26 किंवा 27 डिसेंबर रोजी सुरू होणार शटल सेवा
माथेरान राणी सज्ज...

मिनिट्रेनची शटलसेवा लवकरच पर्यटकांच्या दिमतीला

26 किंवा 27 डिसेंबर रोजी सुरू होणार शटल सेवा

कर्जत,दि.25  गणेश पवार

                जून 2019 नंतर पहिल्यांदा आज माथेरान-नेरळ मिनिट्रेन मार्गावर मिनीट्रेन चलविली गेली.नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्ग पावसाळ्यात झालेल्या भुस्खनन यामुळे नादुरुस्त झाला होता.परिणामी माथेरान स्थानकात थांबवून ठेवलेली मिनीट्रेन आज नाताळ च्या दिवशी नेरळ येथे लोको मध्ये पाठवण्यात आली. दरम्यान, मिनीट्रेनचा आजचा सहा महिन्यानंतर चा प्रवास सुरक्षित झाल्याने कदाचित उद्या 26 डिसेंबर किंवा 27 डिसेंबर रोजी मिनिट्रेनची अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू होण्याची निर्माण झाली आहे.

                  माथेरान- नेरळ मिनीट्रेन नॅरोगेज मार्गाची गेल्या जुन महीन्यात अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती तर काही ठिकाणी रेल्वे रुळावर दरडीचे साम्राज्य निर्माण झाले होते.यासाठी रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेसेवा अनिच्छित काळासाठी बंद केली होती. मात्र मध्यंतरी माथेरानकरांनी आंदोलनचा पवित्रा घेतला होता तर यावेळी माथेरान शिष्ट मंडळाला रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अश्वासना प्रमाणे युद्ध पातळीवर या मार्गाचे काम पुर्ण करत माथेरान - अमन लॉज शटलसेवा सुरु करण्याच्या दृष्टीने 25 डिसेंबर रोजी नियोजित वेळापत्रक प्रमाणे माथेरान स्थानकातील दोन इंजिन तसेच आठ बोगी दुपारी एक वाजताच्या सुमारास रेल्वे अधिकारीवर्ग यांच्या उपस्थितीत ताफ्यासह नेरळला रवाना झाली. यावेळी रेल्वे अधिकारी वर्गाकडुन कल्याण विभागचे इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी  वाय पी सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन मिनीट्रेनच्या इंजिनला पुष्पहार अर्पण केला गेला. या मिनीट्रेनची माथेरान स्थानकातुन सहा महीन्यानंतर सुटका करण्यासाठी प्रयत्न करणारे रेल्वे कर्मचारी वर्गाने दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळे ही रेल्वे सेवा पुर्वत होणार आहे. यासाठी माथेरान स्थानकात उपस्थित कर्मचारी वर्गाने आंनदोत्सव साजरा करत मिठाई वाटली.तर माथेरानकरांमध्ये देखील यावेळी आनंदाचे वातावरण दिसत होते.

              

 

 

 

- मिनिट्रेन चे इंजिन सुरू ठेवणे महत्वाचे -- 

               माथेरान स्थानकातील जुलै 2019 पासून थांबवून ठेवलेल्या मिनिट्रेनचे दोन इंजिन यांना गेली सहा महिने दररोज ऑन केले जाते होते.त्यासाठी आवश्यक असलेले इंधन रेल्वे कर्मचारी नेरळ येथून माथेरान च्या दस्तुरी नाका येथे टॅक्सी ने घेऊन जायचे.त्यानंतर दस्तुरी नाका ते  माथेरान स्टेशन या दरम्यान इंधन भरलेले कॅन डोक्यावर घेऊन माथेरान स्थानकात पोहचत.तेथे जाऊन इंजिन सुरू करण्यासाठी रेल्वे कर्मचारी गेली सहा महिने हे काम करीत आहेत.

माथेरान स्थानकात उभी असलेली मिनिट्रेन उद्या 25 डिसेंबर रोजी नेरळ येथे आणली गेली.नॅरोगेज ट्रक पूर्ववत झाल्याने नेरळ ला सुखरुप आलेली मिनिट्रेन 26 डिसेंबर रोजी पुन्हा माथेरान ला जाईल.26 डिसेंबर रोजी मिनिट्रेनचा माथेरान प्रवास यशस्वी झाला असून मिनिट्रेन ची माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे नेरळ लोको कडून सांगण्यात आले आहे.

     -------- चाचणी यशस्वी ---

             मिनिट्रेन चा आजचा माथेरान नेरळ प्रवास सुरक्षित झाल्याने उद्या 26 डिसेंबर किंवा 27 डिसेंबर रोजी मिनिट्रेनची शटल सेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन काही निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मिनिट्रेन ची अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू झाल्यास नाताळ ची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक यांना लाडक्या मिनीट्रेन मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.त्यातून माथेरान चा पर्यटन व्यवसाय देखील वाढण्यास मदत मिळणार असून गेल्या जून महिन्यापासून मिनीट्रेन बंद असल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.