2021 च्या जनगणनेदरम्यान घरातील व्यक्तींच्या संख्येसोबतच विचरले जातील हे प्रश्न. 

2021 च्या जनगणनेदरम्यान घरातील व्यक्तींच्या संख्येसोबतच विचरले जातील हे प्रश्न. 
____________________________________


2021 मध्ये होणाऱ्या देशाच्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. दर दहा वर्षांनी होणाऱ्या देशाच्या जनगणनेदरम्यान लोकसंख्येसोबतच नागरिकांबाबची विविधा प्रकारची माहिती गोळा करण्यात येतअसते. दरम्यान, 2021 च्या जनगणनेवेळीसुद्धा प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या संख्येसोबतच इतर महत्त्वाची माहितीसुद्धा गोळा केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021ची जनगणना आणि एनपीआरच्या अद्ययावती करणाला मंजुरी दिली आहे. तसेच 2021 च्या जनगणनेचा अर्ज आणि प्रश्नावली  http://www.censusindia.gov.in  या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये जनगणनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे. 2021 च्या जनगणनेमध्ये विचारण्यात येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादी पुढील प्रमाणे आहे.


2021 च्या जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न - 


1) घरांची संख्या


2) जनगणना करण्यात येत असलेल्या घराचा घर क्रमांक.


3)  घराच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेली सामुग्री ( घराच्या भिंती कच्च्या आहेत की पक्क्या)


4) घराचा पत्ता


5) घरातील कुटुंबांची संख्या. 


6) कुटुंबप्रमुखाचे नाव


7) घराची मालकी कुणाच्या नावे आहे?


8) कुटुंबांना राहण्यासाठी किती खोल्या आहेत?


9) पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे?


10) ऊर्जेचा मुख्य स्त्रोत काय?


11) शौचालयाची उपलब्धता?


12) सांडपाण्याचा निचरा कुठे होतो?


13) घरात आंघोळीसाठी सुविधा आहे की नाही?


14) स्वयंपाकघर, एलपीजी, पीएनजीची जोडणी आहे की नाही?


15) स्वयंपाक करण्यासाठी मुख्यत्वेकरून कुठल्या इंधनाचा वापर करता


16) तुमच्याकडे रेडिओ, ट्रांझिस्टर, मोबाईल, स्मार्टफोन आहेत का?


17) घरात टीव्ही, डिश, फ्री डिश आहे का?


18) घरात इंटरनेटची जोडणी आहे का?


19) तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर आहे का?


20) घरात सायकल, स्कूटर, मोटार सायकल आहे का?


21) घरात कार, जीप, व्हॅन आहे का?


22) कुटुंबातील सदस्य बँकिंग सेवेचा वापर करतात का?


23) तुमचा मोबाईल क्रम. फोटो