यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित... डाँ.मेहेर ------------------------------------- "मुक्त विद्यापीठाला कद्र शासनाचा" -------------------------------------

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित... डाँ.मेहेर
-------------------------------------
"मुक्त विद्यापीठाला कद्र शासनाचा"
-------------------------------------
नागपूर:-दि.२५डिसें.(सविता कुलकर्णी):-येथिल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास कद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्च शैक्षणिक संस्थांसाठी दिल्या जाणाऱ्या " स्वच्छ परिसर" राष्ट्रीय पुरस्कराने गौरविण्यात आले. 


      यशवंतराव चव्हाण  महाराष्ट्र विद्यापीठाने बाजी मारत अनिवासी विद्यापीठ विभागात देशात चौथा क्रमांक पटकावला. गेल्या तीन दशकांपासून विद्यापीठाने " ज्ञान गंगा घरोघरी"  हे ब्रीद मिरवत समाजाच्या विविध घटकांतील लाखों विद्यार्थ्यांना "ज्ञानाची दारे" खुली केली आहेत. नोकरी ,व्यवसाय,घर सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणा-यांना कला, वाणिज्य आणि विज्ञानसह कृषीक्षेत्रातील असंख्य पर्याय  या विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. नाशिकच्या गंगापूर धरणालगतचा विद्यापीठाचा दीडशे एकर रम्य,निसर्गसंपन्न व सर्व सोयी सुविधा युक्त परिसर केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकास पात्र ठरत आलेला आहे. विद्यापीठ परिसराच्या याच स्वच्छता- सौंदर्य व सोयीसुविधांवर केंद्र शासनाच्या स्वच्छ परिसर पुरस्काराने शिक्कामोर्तब केले आहे.
      
      नवी दिल्ली येथे केंद्रीय मनुष्यबळ  विकास विभागाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम तसेच केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डी.पी. सिंग आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विद्यापीठाचे मा.कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन ,आ. कुलसचिव डाँ. दिनेश भांडे व विद्यापीठाच्या कृषी विज्ञान  केंद्रीचे कृषी व्यवस्थापक संदिप भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला..सप्टेंबर महिण्यात मिळालेल्या "काँमनवेल्थ आँफ लर्निंग" ह्या पुरस्कारानंतर आता"कद्र  शासनाचा" हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.