खडकी बाजारात भव्य रक्तदानांचे २६ जानेवारी प्रजास्ताक दिनी आयोजन

 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल**खडकी बाजारात  भव्य रक्तदानांचे २६ जानेवारी प्रजास्ताक दिनी आयोजन*

*पुणे :* सह्याद्री प्रतिष्ठान खडकी विभाग, अखिल खडकी मातंग समाज सेवा संस्था व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सयूक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव आजून संपला नाही आहे. तसेच रोज शेकडो रुग्ण सापडत आहे. या कोरोनाच्या संकट काळात कोरोना रुग्णांना रक्ताची फार आवश्यक्ता असते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा पडत आहे. या तुटवड्यावर मात करण्यासाठी मंगळवार दि- २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीरचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबीर मातंग समाज मंदीर लक्ष्मी कॉलनी खडकी पुणे- ३ या ठिकाणी होणार आहे. संस्थेकडून अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. चला करू नवीन वर्षाची सुरवात रक्तदानाने.वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन चला रक्तदान करूया. जर आपणांस रक्तदान करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन करा.