पुणे विभागातील 5 लाख 41 हजार 849 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 64 हजार 999 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पुणे :- *पुणे विभागातील 5 लाख  41 हजार 849 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*

        *विभागात कोरोना बाधित 5 लाख 64 हजार 999 रुग्ण*

                                                           *-विभागीय आयुक्त सौरभ राव*

        पुणे,दि.3 :- पुणे विभागातील 5 लाख 41 हजार  849 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 64 हजार 999 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 469  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.90 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*पुणे जिल्हा*

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 64 हजार 43 रुग्णांपैकी 3  लाख 49 हजार  593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5  हजार 708 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 742  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.40 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  96.03 टक्के आहे.

*सातारा जिल्हा*

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 501  रुग्णांपैकी 52 हजार 81 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 653 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सोलापूर जिल्हा*

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 287 रुग्णांपैकी 46 हजार 684 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 873 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 730  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

*सांगली जिल्हा*

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 627  रुग्णांपैकी 45 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 192 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कोल्हापूर जिल्हा*

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 541 रुग्णांपैकी 47  हजार 789 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  43 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 653 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 492,  सातारा जिल्ह्यात 63, सोलापूर जिल्ह्यात 76, सांगली जिल्ह्यात 15 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*  

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 835 आहे.  पुणे जिल्हयामध्ये 735, सातारा जिल्हयामध्ये 34, सोलापूर जिल्हयामध्ये 48, सांगली जिल्हयामध्ये 16 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे.

*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*

आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 35 हजार 186 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  64  हजार 999 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  2 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

*****