माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह,पुणेतर्फे प्रगतशील शेतकरी गणपतराव उर्फ लहानुभाऊ नागरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह,पुणेतर्फे


प्रगतशील शेतकरी गणपतराव उर्फ लहानुभाऊ नागरे


यांना भावपूर्ण श्रद्धांजली


पुणे, दि.5 डिसेंबरः अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जेवुर कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी, शिक्षण तज्ञ व राजकारणी गणपतराव विठोबा उर्फ लहानुभाऊ नागरे यांना विश्वशांती केंद्र (आळंदी) व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह,पुणेतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.


एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, लहानुभाऊ नागरे यांच्याशी ऋणानुबंध होते. शेती, शिक्षण, सहकार व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली होती. त्यांच्या जाण्याने संस्थेची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


देशाच्या संरक्षण दलाचा परिपूर्ण अभ्यासू लहानुभाऊ नागरे यांची 1972 साली इंदिरा गांधी यांनी त्यांची निवड परराष्ट्र दौर्‍यामध्ये शेती विषय अभ्यास करण्याकरीता एका शिष्टमंडळाचे प्रमुख केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ते शिक्षण तज्ज्ञ, तालुका काँग्रेस कमिटचे माजी अध्यक्ष, संजीवनी सह. सा. कारखान्याचे सलग 35 वर्षे संचालक होते. तसेच संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त व संस्थापक म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सलग 20 वर्षे पदे भुषविले होते.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनीही त्यांना श्रद्धाजली वाहिली.