सखी च्या माहेरवासाची अनोखी गोष्ट - 'अस्सं माहेर नको गं बाई' ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सखी च्या माहेरवासाची अनोखी गोष्ट - 'अस्सं माहेर नको गं बाई' ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई :- लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळाली तर?


अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या 'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेची. सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणि श्रद्धेमुळे पाणी पडत. सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. अशा आशयाचा एक प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला.


या मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


पुष्कराज आणि स्वानंदी ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता हीच जोडी पुन्हा नवीन मनोरंजन घेऊन येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.


ही मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच ठरेल. अशी ही विनोदी मालिका आणि सखीच जगावेगळं माहेर एकंदरीत सगळ्यांना आवडेल असं वाटतंय.


पाहायला विसरू नका, 'अस्सं माहेर नको गं बाई' ७ डिसेंबरपासून सोम.-शनि. रात्री १०:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.