भारत बंदला पाठिंबा भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल भारत बंदला पाठिंबा भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा 


पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी (दि. ८) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद देत अनेक राजकीय पक्षांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष कामगार युनियन देखील भारत बंदमध्ये सहभागी होणार असून, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते मा. संतोष सागवेकार यांनी याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या निवेदनात म्हटले आहे की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने आणलेले अनेक कायदे शेतकरीविरोधी आहेत. सरकार केवळ व्यापारीधार्जिणे निर्णय घेत आहे. त्यामुळे कृषिप्रधान देश असतानाही भारतातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सरकारने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत. सरकार हे कायदे मागे घेत नसल्याने मंगळवारी (दि. ८) भारत बंदची हाक देण्यात आली असून, या बंदला भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image