पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पदवी / पदविका प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी निवेदन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा पदवी प्रदान समारंभ मार्च / एप्रिल, २०२१ मध्ये होणे अपेक्षित आहे. ११८ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी / पदवीका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने (Online mode) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, शुल्क इत्यादीबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदरची मुदत खालीलप्रमाणे आहे.

                  दि. ०८ डिसेंबर, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत (नियमीत शुल्कासह)

                  दि. ०१ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ पर्यंत (विलंब शुल्कासह)

पदवी / पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज योग्य शुल्कसह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकीतप्रत upload करणे आवश्यक आहे.

तरी कृपया सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी.