पुणे प्रवाह न्युज पोर्टल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारविश्व सर्वांसाठी मार्गदर्शक
- कुलगुरु डॉ. नितीन करमळकर
पुणे - "विद्यापीठ प्राध्यापकांच्या परिप्रेक्षातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विविध पैलुंच्या माध्यमातून साकारलेले "आंबेडकरी विचारविश्व" हे पुस्तक सर्वांसाठी मार्गदर्शक आहे" असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विषद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यसनाच्या वतीने डॉ. धनंजय लोखंडे आणि डॉ. दिपक गरुड यांनी संपादित केलेल्या "आंबेडकरी विचारविश्व" या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील शिक्षकांनी एकत्रित येऊन पुस्तक निर्मितीचा असा प्रकल्प सिध्दीस नेला ही अभिमानास्पद बाब आहे असे मत कुलगुरुंनी व्यक्त केले.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख डॉ. मनोहर जाधव, तसेच विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. संपादकीय प्रास्ताविक डॉ. दिपक गरुड यांनी केले. डॉ. धनंजय लोखंडे यांनी पुस्तक निर्मितीची भूमिका विषद केली तर अध्यासन प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी पुस्तकातील अंतरंगाविषयी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन आणि आभार डॉ. गीता शिंदे यांनी केले.