स्वराज्यजननी जिजाऊ” मालिका रंजक वळणावर, नीना कुलकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने वाढणार रंगत

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


स्वराज्यजननी जिजाऊ” मालिका रंजक वळणावर, नीना कुलकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने वाढणार रंगत 

पुणे, १३: (वार्ताहर): अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळवणाऱ्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या सोनीमराठी वाहिनीवरील मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि डॉ.अमोल कोल्हे आता मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्ताने डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी पुण्यात संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. 

जगदंब क्रिएशन्स ही निर्मितीसंस्था आणि सोनी मराठी यांच्याकडून ही मालिका प्रदर्शित केली जात आहे. या मालिकेचा दृष्टिकोन जिजाऊ माँसाहेब यांच्या दृष्टीने दाखवला जाणार आहे. त्यामुळे ही भूमिका आता प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी साकारणार आहेत.

माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्ववाने देवत्व प्राप्त करता येते हे शिकवणाऱ्या शिवरायांची भूमिका साकारायला मिळणे हे भाग्याचं आणि जबाबदारीचं काम असल्याची भावना डॉ.कोल्हे यांनी व्यक्त केली.

स्वराज्याचा पसारा सांभाळणाऱ्या जिजाऊंचे स्वराज्यासाठी नैतिक अधिष्ठान होते, असे जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण असल्याचे नमूद करताना डॉ.अमोल कोल्हे यांनी ही केवळ मालिका नसून संस्कार असल्याची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या स्वराज्याची यशोगाथा आगळ्यावेगळ्या दृष्टीने सांगणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image