आसूड आंदोलनाद्वारे मोदी सरकारवर हल्लाबोल

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल

Respected Sir / Madam, 

Press Release 

Greeting ! 

*आसूड आंदोलनाद्वारे मोदी सरकारवर हल्लाबोल* 

*( शेतकऱ्यांच्या आंदोलनाला झोपडपट्टी सुरक्षा दलाचा पाठींबा )*

पुणेः- कृषी धोरणासंदर्भात मोदी सरकारने जी हुकूमशाही अवलंबली आहे, ती निषेधार्ह असून शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. निदान त्या घटकाबाबत तरी मोदी सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी. देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षित असून हुकूमशाही मार्गाने केलेले कृत्य भारतीय नागरिक कदापि सहन करणार नाहीत, याची जाणीव मोदी सरकारने ठेवून वेळीच योग्य तो तोडगा काढवा, अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली.   

पंजाब मधील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मोदी सरकारच्या शेतकरी विरोधातील अन्यायकारक धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ आज झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना वैराट बोलत होते. 

या आंदोलनात महम्मद शेख, सुरेखा भालेराव, 

संतोष बोतालजी, काशीनाथ गायकवाड,

प्रदीप पवार, बापू शेंडगे, वामन कदम, महादेव मोरे, वैशाली अवघडे, दत्ता कांबळे, संतोष कदम, सविश कांबळे, श्रद्धा दिघे, आबा चव्हाण, संतोष सोनवणे, हरिभाऊ वाघमारे, सोनिया जाधव, वंदना पवार, गणेश कांडगे, सुनील भिसे, अर्चना वाघमारे, सूर्यकांत सकपाळ, लक्ष्मण बिराजदार, सविता जगताप यांच्यासह झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना भगवानराव वैराट म्हणाले की, पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी गेले कित्येक दिवस दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत कुटुंबातील सगळ्या सदस्यांसह जे आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनाचे दाहक वास्तव मोदी सरकारने लवकर न ओळखल्यास शेतक-यांच्या उद्रेकाच्या या लाटेत मोदी सरकार वाहून जाईल. संविधानिक मार्गाने आंदोलन करणा-या शेतकरी बांधवांवर पोलीस आणि लष्करी बळाचा वापर करून ते दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. एवढेच नव्हे तर या आंदोलनात चीन पाकीस्तान सारख्या परकीय शक्तींचा हात असल्याचा अपप्रचार करून शेतक-यांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केवळ चर्चेच्या फे-यांमध्ये अडकवून मोदी सरकार वेळकाढूपणा करीत आहे. पण पंजाब, हरियाणामधील शेतकरी आंदोलकांचा निर्धार कायम असून भारतासह महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना, अभ्यासक, विचारवंत यांचा या आंदोलनास सक्रीय पाठिंबा आहे. दिल्लीत पंजाब, हरियाणा येथील शेतक-यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी प्रातिनिधीक स्वरूपात सहभागी झाले आहेत. मात्र, त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्रातील देखील हे आंदोलन सक्रीय होऊन त्याचा उद्रेक होईल, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. 

छायाचित्र ओळीः- पंजाब मधील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आंदोलकांना मार्गदर्शन करताना भगवानराव वैराट. 

जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस

Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image