नियमभंग करणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्सवर कारवाईची मागणी

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


नियमभंग करणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्सवर कारवाईची मागणी 

पुणे :- सोशल डिस्टनचा फज्जा उडवणाऱ्या व नियमांचे पायमल्ली करणाऱ्या पुण्यातील मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स् , या ठिकाणी कॉविड 19 च्या काळात लग्न समारंभासाठी 50 लोकांची परवानगी असताना 

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. तरी पोलीस आयुक्त पुणे शहर व आयुक्त पुणे महानगरपालिकाने लक्ष घालावे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य बाबत खबरदारी घेतली जात नाही.

पुणे शहरातील मंगल कार्यालये यांच्या प्रवेशद्वारावर सक्तीने सॅनिटाईझर, मशीन, मास्क, टेम्प्रेचर मशीन, लोकांची नावे नोंद करण्यासाठी नोंद वही व हे सर्व देखरेख करण्यासाठी एक व्यक्ती ठेवणे आवश्यक आहे.

 तसेच सोशल डिस्टन्सचे पालन देखील होत नसल्यामुळे कोव्हिडं संकट मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तरी पुणे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी या कडे लक्ष देवून नियमांचे पालन न करणाऱ्या मंगल कार्यालये, हॉटेल, लॉन्स यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी म्हणून ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डाचे सनी निम्हण यांनी अशा मागणीचे पत्र दिले आहे.