कोरोना काळातील सेवेबद्दल डॉ.सुनीता मोरे यांचा गौरव

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


प्रेस नोट 


कोरोना काळातील सेवेबद्दल डॉ.सुनीता मोरे यांचा गौरव 


पुणे :

  कोरोना विषाणू साथीच्या काळातील  सेवेबद्दल चंदुकाका सराफ सन्स प्रा लि आणि क्लास अपार्ट इंडिया या संस्थांच्या वतीने  डॉ.सुनीता मोरे यांचा गौरव   करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. 


 डॉ.सुनीता मोरे यांनी कोविड हेल्प डेस्क,समुपदेशन,व्ही डी ओ द्वारे जागृती,प्रतिकार शक्ती वाढवायला आहार मार्गदर्शन प्रत्यक्ष आणि सोशल मीडियाद्वारे केले.रुग्ण आणि नातेवाईकांमधील समन्वय साधणे असे योगदान डॉ. सुनीता मोरे यांनी केले.काही रुग्णांची हॉस्पिटलची  बिले कमी करण्यासाठी प्रयत्न केले.हेल्प लाईन द्वारे मार्गदर्शन करून रुग्णांना हॉस्पिटल मिळवून देणे,रुग्णवाहिका मिळवून देणे,रेमेडिसिव्हर इंजेक्शन मिळवून देणे यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.    ....................................................