स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मरणदिनानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मरणदिनानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या कार्यकाळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मिळाला. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या या महान सरसेनापतींच्या स्मरणदिनी उर्वीता प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी दिली.

बुधवार दि. 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत कला प्रसाद मंगल कार्यालय, विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे हा रक्तदान महायज्ञ होणार आहे. याप्रसंगी प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित आगामी भव्य, ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच पुण्यातील कलाकार सुद्धा रक्तदान करणार आहेत. या महायज्ञात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास या चित्रपटाचे निर्माते शेखर महिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांच्याकडून ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटांची कृतज्ञतापूर्वक भेट दिली जाणार आहे. या रक्तदान महायज्ञात जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी केले आहे.

Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image