पुणे प्रवाह न्युज पोर्टल
स्टार प्रवाहवरील ‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर अवतरली ‘सांग तू आहेस का’ मालिकेची टीम
सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीची खास उपस्थिती
पुणे :-स्टार प्रवाहवरील ‘कॉमेडी बिमेडी’ आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले. निमित्त होतं ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या विशेष भागाचं. या खास भागात सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी खास हजेरी लावत विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला. आशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी यानिमित्ताने खास स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमला हसू आवरलं नाही आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं भरभरुन कौतुक केलं.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न आहे. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि भन्नाट विनोदी किस्से जर अनुभवायचे असतील तर ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाचा या आठवड्यातील भाग नक्की पाहा शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.