पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नेरळ हत्याकांड प्रकरणाचा अवघ्या आठ तासात नेरळ पोलिसांनी लावला छडा.
कर्जत दि.17 गणेश पवार
गुन्ह्यातील फरार असलेल्या संबंधित आरोपीं चार्स नाडार व पत्नी हिला मुंबई-मीरा रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात कर्जतचे DYSP अनिल घेर्डीकर यांनी नेरळ-माथेरान आणि कर्जत येथील पोलीस ठाण्याची एक टीम तयार केली होती तर अलिबाग येथील LCB ला देखील बोलावण्यात आले होते.पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ शहरात सर्व स्थरातून कैतुक होत आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे देखील घटनास्थळी हजार झाले होते.
नेरळ-रेल्वे स्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेस मध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती.या मृत देहाचे तुकडे करून या सुटकेस मध्ये भरण्यात आले होते,सुरुवातीला या मृत देहाचे डोके सापडून न आल्याने मयत व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना खूप अडचणी येत होत्या,मयत व्यक्तीचे डोके हे उशिरा नेरळ पूर्व भागातील नाल्यात सापडून आल्याने पोलीस तपासाला वेग आला होता,यावेळी आरोपीने मयत व्यक्तीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य-तसेच सुटकेस व मद्यपी द्रव हे नेरळ येथील व्यापारी वर्गाकडून नेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर,गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागण्यास CCTV कॅमेराचा फार मोठा उपयोग झाला होता.आरोपी नवरा बायको असल्याचे पोलिसांन समोर येताच.ते नेरळ येथील राज बाग येथील गृहप्रकल्पात गेली दोन वर्षे भाडे तत्वावर राहत आहेत.तर आरोपी यांनी मयत व्यक्तीस मारून त्याचे तुकडे हे सुटकेस भरण्यात आल्यानंतरचा सर्व प्रकार हा CCTV कॅमेरात कैद झाला होता.या माहितीच्या आधारावर नेरळ पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतल्यावर मयत व्यक्ती हा वरळी पोलीस ठाणे हद्दीत राहणार असून त्याचे नाव सुशीलकुमार मारुती सरनाईक असल्याचे समोर आले.मयत सुशीलकुमार यांची ओळख आरोपी नाडार यांच्या पत्नीशी सोशयल मीडियावर भेट झाली होती .यातच सरनाईक नेरळ येथे भेटण्यासाठी येत होता.
सरनाईक यांची हत्या नेमकी का व कश्यासाठी करण्यात आली हे अद्याप समोर आले नसून नेरळ पोलीस अधिक तपास घेत आहेत.